CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

यूपीएससीत ६५१ वा क्रमांक मिळविणाऱ्या शिवम वखरे यांचा डोंबिवलीत गौरव

नाभिक समाज संघटनेतर्फे शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार

CRIME BORDER | 05 November 2026 | 11:50 AM

यूपीएससीत ६५१ वा क्रमांक मिळविणाऱ्या शिवम वखरे यांचा डोंबिवलीत गौरव

डोंबिवली : विशेष प्रतिनिधी :- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) २०२४ च्या नागरी सेवा परीक्षेत डोंबिवलीचे शिवम सीमा राजेंद्र वखरे यांनी देशात ६५१ वा क्रमांक मिळवून यश संपादन केले. त्यांच्या या उल्लेखनीय यशाची दखल घेत नाभिक समाज संघटना, डोंबिवली यांच्या वतीने ३ नोव्हेंबर रोजी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब राऊत, सचिव मंगेश पोफळे सर, सह - खजिनदार तुषार शिंदे व अन्य पदाधिकाऱ्यांनी शिवम यांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र प्रदान करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शिवम वखरे यांनी यूपीएससीसारख्या देशातील अत्यंत आव्हानात्मक परीक्षेत मिळविलेले यश हे डोंबिवलीसह संपूर्ण समाजासाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या यशामुळे समाजातील नव्या पिढीला स्पर्धा परीक्षांकडे वळण्यासाठी निश्चितच प्रेरणा मिळेल, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

या वेळी शिवम यांचे वडील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वखरे, आई तथा क्राईम बॉर्डरच्या संपादिका सीमा राजेंद्र वखरे आणि लहान भाऊ सत्यम वखरे उपस्थित होते.

सत्काराबद्दल शिवम वखरे यांनी नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.