CRIME BORDER | 08 November 2026 | 05:44 PM
डोंबिवली :- डोंबिवलीच्या फडके रोडवरील दिवाळी पहाट कार्यक्रमात UPSC नागरी सेवा परीक्षेत ऑल इंडिया रँक 651 प्राप्त करणारे कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे यांचा गणेश मंदिर संस्थान आणि समस्त डोंबिवलीकरांच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर सत्कार करण्यात आला.
या गौरव सोहळ्याला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपमहापौर गणेश मंदिर साहेब,संस्थानचे विश्वस्त श्री. राहुल दामले, गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षा मुतालिक मॅडम, डीसीपी श्री. अतुल झेंडे साहेब, एसीपी श्री. विजय मराठे साहेब, रामनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे साहेब तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते शिवम यांचा सन्मान करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेले यश... संस्थेचा सन्मान आणि डोंबिवलीकरांची कौतुकाची थाप!
दिवाळीच्या मंगलमय पहाटे उजळलेली ही यशाची पहाट असंख्य युवकांसाठी प्रेरणादायी ठरली.
शिवम वखरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!