CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

ठाणे जिल्ह्यात 11 ते 18 नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सप्ताहा’चे आयोजन; आदिवासी बांधवांना मिळणार शासनाच्या विविध योजनांचा लाभ

CRIME BORDER | 13 November 2026 | 11:12 AM

No image available

ठाणे :-  धरती आबा क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर यांच्या वतीने 11 ते 18नोव्हेंबर 2026 या कालावधीत संपूर्ण प्रकल्प कार्यक्षेत्रात 'जनजातीय गौरव सप्ताह' उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सप्ताहात विविध लोकोपयोगी उपक्रम, आरोग्य शिबिरे आणि शासकीय योजनांच्या लाभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, सहायक प्रकल्प अधिकारी व नोडल अधिकारी अरविंद जाधव आणि आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त अशोक इरनक यांनी दिली आहे.

     या गौरव सप्ताहानिमित्त 12 नोव्हेंबर रोजी भिवंडी तालुक्यातील रावत्याचा पाडा येथे जात दाखले आणि आधार कार्ड शिबिर घेतले जाईल. 13 नोव्हेंबर रोजी भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा येथे न्यूक्लियस बजेट योजना व महिला बचत गटांना धनादेश वाटप, घरकुल, आयुष्यमान कार्ड, आरोग्य शिबिर, नवीन अर्ज स्वीकारणे आणि स्वयंरोजगार व कृषीपूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.14 नोव्हेंबर रोजी शहापूर तालुक्यातील उंभ्रई किन्हवली येथे सर्व आदिवासी स्मारके व पुतळ्यांची स्वच्छता करून सायंकाळी दीपोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  

     या कार्यक्रमाला अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) आमदार दौलत दरोडा आणि अशोक इरनक उपस्थित राहणार आहेत.

      मुख्य जयंतीदिनी 15 नोव्हेंबर रोजी मुरबाड तालुक्यातील मोरोशी आणि शहापूर प्रकल्प कार्यालयात आमदार किसन कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवान बिरसा मुंडा व इतर आदिवासी महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन केले जाईल. यावेळी गेल्या 12 वर्षांतील पद्म पुरस्कारप्राप्त व 'मन की बात'मध्ये उल्लेख झालेल्या आदिवासी विभूतींचा तसेच दहावी-बारावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या आश्रमशाळेतील तीन विद्यार्थ्यांचा सत्कार होणार असून रानभाजी व खाद्य महोत्सवाचेही आकर्षण असेल.

     पुढील टप्प्यात 16 नोव्हेंबर रोजी शहापूर तालुक्यातील चिंध्याचीवाडी आणि अंबरनाथ तालुक्यातील लव्हाळी येथे आधार कार्ड, रेशन कार्ड, सुकन्या समृद्धी योजना, वैयक्तिक व सामूहिक वनहक्क दाव्यांबाबत मार्गदर्शन आणि आरोग्य तपासणी शिबिर होईल. 17 नोव्हेंबर रोजी शहापूर तालुक्यातील अघई येथे विविध दाखल्यांसह रक्तदाब, मधुमेह व सिकलसेल तपासणी शिबिर, माता-बाल संगोपन, पोषण आहार जनजागृती, वनपट्टेधारकांसाठी विशेष शिबिर आणि राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेबाबत मार्गदर्शन केले जाईल.

     या सप्ताहाचा समारोप 18 नोव्हेंबर रोजी मुरबाड तालुक्यातील खुटल येथे होणार आहे. समारोपाच्या दिवशी विविध दाखल्यांचे शिबिर, युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, अप्रेंटिसशिप, स्वयंरोजगार, बँक खाती व शिष्यवृत्ती नोंदणी, तसेच महिला बचत गटांच्या सहभागातून राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेची माहिती दिली जाणार आहे.

     या सर्व उपक्रमांचा आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.