CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

पाथर्डी च्या भूमिपुत्राची हैदराबादच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती महेश भागवत यांच्या निवडीने शेवगाव-पाथर्डी तालुक्याचा गौरव; मित्रमंडळीकडून अभिनंदन

CRIME BORDER | 16 November 2026 | 08:47 PM

हैदराबादच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती महेश भागवत
हैदराबादच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती महेश भागवत

पाथर्डी (प्रतिनिधी) :- अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याचे सुपुत्र आणि १९९५ च्या बॅचचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी महेश भागवत यांची हैदराबाद शहराच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे अ. नगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, शेवगाव-पाथर्डी, शिरूर तालुक्यातील मित्रमंडळीकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
         प्रदीर्घ पोलीस सेवेत भागवत यांनी कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीचा ठसा उमटविला आहे. मानवी तस्करीविरोधातील लढा, महिला व बालकांचे संरक्षण, बालमजुरीचे निर्मूलन तसेच पीडितांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. या कामाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेण्यात आली आहे.पोलीस अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अनेक युवकांना प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या कार्यातील संवेदनशीलता आणि सामाजिक जाणिवा ही त्यांच्या कारकिर्दीची वैशिष्ट्ये ठरली आहेत.
हैदराबादसारख्या महानगराच्या पोलीस आयुक्तपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीचा शहराच्या कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेला लाभ होईल, असा विश्वास मित्रमंडळींनी व्यक्त केला.
         “अधिकार पदामुळे मिळतात; मात्र माणसांच्या मनातील आदर हा कर्तृत्व, प्रामाणिकपणा आणि सेवाभावातून निर्माण होतो,” या शब्दांत मित्रमंडळींनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. पाथर्डीच्या मातीतून घडलेल्या या अधिकाऱ्याची देशातील महत्त्वाच्या महानगराच्या पोलीस आयुक्तपदी झालेली नियुक्ती नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
 या नियुक्तीबद्दल शेवगाव-पाथर्डी-शिरूर तालुक्यातील मित्रमंडळीकडून महेश भागवत यांना अभिनंदनासह पुढील कार्यकाळासाठी उत्तम आरोग्य, यश आणि उज्ज्वल वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात  येत आहेत.