CRIME BORDER | 16 November 2026 | 09:00 PM
हिऱ्यालाच पैलू पडतात, चिरंजीव शिवम सीमा राजेंद्र वखरे यांनी यूपीएससी परीक्षेमध्ये मिळवलेल्या यशात सर्व क्षेत्रातील लोकांचा खारीचा वाटा निश्चित आहे. त्याचे आई वडिलांचा त्याग हा नजरेतून जात नाही ,सदाशिव म्हात्रे ,आमदार राजेश मोरे माजी पोलीस अधिकारी श्याम काटकर, क्राईम बॉर्डर परिवार अशांनी सतत मानसिक आर्थिक मदत करून सौ. सीमा वखरे राजेंद्र वखरे चि.शिवम चि.सत्यम यांचा उत्साह वाढवला. या सर्वांना पाहताना मी त्यांना सतत उभारी देऊन सत्यम आणि शिवम हे तुमचा पांग फेडणार आहेत हे सतत सांगत आलो आहे.
नेहमी नेहमी आग्रह करून मला घरी बोलावण्याचा सौ. सीमा आणि श्री .राजेंद्र वखरे हे प्रयत्न करत असतात. एकदा मी असाच वर्तमानपत्राचे कामानिमित्त त्यांचे घरी गेलो होतो. आग्रहाने बोलावून मी आलेलो असल्याने दोघांनाही आनंदापेक्षा चिंता जास्त वाटत होती, हे त्यांचे चेहऱ्यावरून मी सहज जाणले .चहा झाल्यानंतर बाबा तुम्ही फ्रेश व्हा मी आता खाली जाऊन येतो .कारण राजेंद्र हे सदाशिव म्हात्रे यांची खोलीमध्ये कॉम्प्लेक्स मधील तिसऱ्या मजल्यावर ती राहत होते.मी त्यांची घालमेल पहिली परंतु जास्त हस्तक्षेप न करता मी म्हणालो की राजेंद्र मी थोडा वेळ थांबणार आहे .मला जेवायला बाहेर जायचे आहे. तेव्हा दोघेही असे नाही बाबा तुम्ही इतक्या दिवसांनी आलात आणि जेवणाशी कसे जाल असे म्हणून मला त्यांनी थांबवले होते, तसे पाहता मी खरोखर त्या दिवशी त्यांच्याकडे जेवणासाठीच गेलो होतो .मी थांबलो सत्यम ,शिवम सोबत संगणकावर त्यांची बुद्धिमत्ता आणि कसब पाहत होतो.
मला माझ्या जेवणाची कधीही चिंता असण्याचे कारणच नव्हते, कारण माझा धुळे ,जळगाव ,ठाणे, कल्याण, भिवंडी, डोंबिवली इत्यादी ठिकाणी फार मोठा मित्रपरिवार असल्याने जेवणासाठी मी बहुतेकाच्या वाट्याला येत नसतो परंतु या जोडप्याकडे आणि त्यांच्या घराकडे पाहून त्यांना ओझे नको म्हणून मी एकटाच त्यांच्या घरी गेलो होतो. सकाळी अकरा वाजता गेलेले राजेंद्र वखरे हे दुपारी एक वाजता हातात कसली तरी पिशवी घेऊन आले होते. त्यात काहीसा बाजार दिसत होता परंतु तो बाजार काय आहे ते माझ्या लक्षात येत नव्हते. जेवणाची वेळ झाली सौ. सिमाने बाबा हात धुवून घ्या, जेवण वाढते असे म्हणाले मी मीही मुलीची आज्ञा म्हणून लगेच हात धुवून शिवम आणि सत्यम सह जेवायला बसलो राजेंद्र मात्र पुन्हा कुठेतरी न सांगताच बाहेर गेला होता.
आग्रहाने बोलावून मला प्रेमाने जेवायला घातले होते .ताटामध्ये एकच पदार्थ होता तो म्हणजे कण्या होत्या, माझ्यासोबत राजेंद्र जरी नसला तरी चिरंजीव शिवम आणि सत्यम सह मी त्या कन्या ज्या 1972 सालच्या दुष्काळामध्ये खायला मिळाले होते. त्या आवडीने खाल्ल्या होत्या सौ.सीमा ही डोळ्यातील अश्रू लपवून बाबा अजून थोडे कन्या वाढू का? असे म्हणाली मी अगदी मुद्दाम लापट सारखा ओबीटी थोड्या कन्या वाढ अजून, या युगातही इतकी गरिबी असू शकते याची कल्पना मला नव्हती मी ते कन्याचे जेवण आवडीने खाल्ले. राजेंद्र माझे सोबत जेवणासाठी का थांबला नाही ? याचे कोडे उलगडले होते. मी हि जेवण छान झाले असे म्हणालो. सौ .सीमा वखरे ही दाराआड होऊन रडत होती.
दोन्ही मुलांनी पाच पक्वान्न जेवल्यासारखे कन्या खाऊन नेहमीसारखे हसत मला हात पुसायला रुमाल देत होते. बाबा बडीशेप खा ,बाबा बसा असे म्हणत होते, तसे पाहता माझ्याकडे तर अश्रूचे भांडारच आहे आणि त्या भंडार रुपी अश्रूला बाथरूम मध्ये जाऊन वाट करून दिली. राजेंद्र वखरे येईन पावतो मी त्यांचा निरोप घेतला .अर्थात मुलांच्या हातात नातवंडे समजून दोन ,पाच हजार रुपये देऊन निघालो. तिघांनीही माझा आशीर्वाद घेतला होता. मला आग्रह करून आणि बोलावूनही राजेंद्र सौ.सीमा त्यांच्या इच्छेप्रमाणे परिस्थितीमुळे जेवणही देऊ शकले नाहीत याची खंत त्यांना वाटल्याने राजेंद्र समोरही थांबला नाही. सीमा मात्र वाटे लावी पायेतो रडतच होती.
आज चिरंजीव शिवमने यूपीएससी परीक्षेत अपेक्षित यश मिळवून राजेंद्र आणि सौ.सिमाचे.पांग फेडले आहेत. काल पावेतो राजेंद्र व सौ. सीमाला पाहण्याच्या नजरा फक्त शिवमने यूपीएससी परीक्षेत मिळवलेल्या यशामुळे बदलल्याआहेत. आयुष्यभराचे आमदार ,खासदार इतकेच नव्हे तर मंत्रीपदाचा दर्जा या चिरंजीव शिवमने मिळवला आहे ,सत्यम हा तर काकणभर सरसच आहे. त्याचे नशीबी यापेक्षा कमी काहीही नसणार आहे चिरंजीव शिवमचे त्याने मिळवलेल्या यूपीएससी परीक्षेतील यशाबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभ आशीर्वाद त्याची हातून आई-वडिलांची समाजाची सेवा घडो हीच परमेश्वराकडे प्रार्थना.
जय हिंद, वंदे मातरम
अपर पोलीस अधिक्षक डी .डी .गवारे (ACB)