CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

हिऱ्यालाच पैलू पडतात, चिरंजीव शिवम सीमा राजेंद्र वखरे यूपीएससी Rank - 651 -Part -2

अपर पोलीस अधिक्षक डी .डी .गवारे (ACB)

CRIME BORDER | 16 November 2026 | 09:01 PM

No image available

पैलू हिऱ्यालाच पडतात, आसपासच्या जगतामध्ये मोठ- मोठे भांडवलदार, करोडपती ,नेते ,मंत्री आणि उद्योगपती आपल्या मुलाला साधारणपणे आयपीएस, आय आर एस, आय एफ एस, आय ए एस अशा पदावर गेलेले पहावयाचे स्वप्न पाहतात. त्यातली त्यात आयपीएस आणि आयएएस या पदाची हव्यास अशा लोकांना असते. परंतु फक्त हव्यास संपत्ती आणि समाजात प्रतिष्ठाच असून चालत नाही. अनेक भांडवलदार आपल्या मुलांना लाखो रुपये खर्च करून मुंबई दिल्ली येथे यु पी एस सी परीक्षेच्या तयारीसाठी पाठवतात .अनेक सोयी सवलती उपलब्ध करून देतात परंतु हाती निराशाच येते किंवा आलेल्या अभ्यासाचं अशा लोकांना काही आपत्ती पोहोचवत नाही .
         आज अशा अनेक विद्यार्थ्यांपैकी कल्याण (जळगाव ) मातृभूमी असलेला चिरंजीव शिवम सीमा राजेंद्र वखरे या मुलाने यूपीएससी मध्ये 651 क्रमांकाने यश मिळवून आपल्या आई-वडिलांचे कष्टाचे ,त्यागाचे  पांग फेडले आहेत. त्याचे  आई वडील इतके देशभक्त आहेत की, त्यांनी त्यांच्या मुलांची नावे सत्यम, शिवम अशी ठेवली आहे. मुलगी झाली असती तर निश्चितच तिचे नाव सुंदरम अर्थात सुंदरी असेच ठेवले असे वाटते. परंतु शासनाचा कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाच्या अधीन राहून त्यांना सुंदरी प्राप्त झाली नाही. अन्यथा त्यांनी सत्यम ,शिवम ,सुंदरम ची प्रचिती घरातच आणून दिली असती. 
         राजेंद्र वखरे हे जळगाव निवासी असून काम- धंद्या निमित्त कल्याणला आलेले आहेत. त्यांच्या आयुष्यात सुंदर अशी मुलगी सीमा ही पत्नी म्हणून लाभली .मी जळगाव जिल्ह्यामध्ये नोकरी केलेला असल्याने साधारण 1999 साली राजेंद्र वखरे हे माझ्याशी जोडले गेले. मी त्याकाळी पोलीस उपनिरीक्षक म्हणून विष्णुनगर पोलीस स्टेशन डोंबिवलीला होतो. मला असलेले ज्ञान आणि प्रतिष्ठित असे पोलीस उपनिरीक्षक असे पद असल्याने मला राजेंद्र ला वैचारिक आणि अन्य काही मदत करता आली. त्याचा स्वभाव पाहता तो माझ्याकडे आल्यानंतर त्याचा मला कधीही कंटाळा आला नाही .अधून मधून सौ. सीमा राजेंद्र वखरे याही माझ्याकडे येत असेल तसा त्यांच्या वयाचा आणि माझ्या वयाचा खूप काही फरक नसला तरी मला राजेंद्र हे वडिलांच्या स्थानी मानत असंत आणि माझी कडूनही तशाच पद्धतीने त्यांना मदत आणि मार्गदर्शन होत होते .
        राजेंद्र आणि सौ .सीमांना सत्यम आणि शिवम अशी दोन आपत्ती झाली .राजेंद्र हा प्राध्यापकाची नोकरी करत होता, परंतु ती अतिशय जुनी पगाराची नोकरी असल्याने आणि त्याच्यामध्ये असलेले पारखी गुणामुळे तो सामाजिक सेवेकडे वळला. त्याला  सौ .सीमाची मनस्वी जोड होती. क्राईम बॉर्डर,श्री स्वामी सखा आणि अशाच प्रकारचे साप्ताहिक ,पाक्षिक, मासिक काढून  सामाजिक बांधिलकी जपत होता. राजेंद्र ला मदत लागल्यानंतर तो अडखळत अडखळत का होईना माझ्याकडे येत असेल ,असाच एकदा मी कल्याणला कोळशेवाडी पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक असताना सत्यम आजारी आसल्याने आला होता. मी त्यावेळी दवाखान्याचा चार-सहा हजार रुपये असा पूर्ण खर्च केला होता. 
      राजेंद्र आणि सौ. सीमा यांनी चालवलेले वर्तमानपत्र आणि टीव्ही न्यूज यासाठी मी सतत त्यांचे पाठीशी होतो. शिवम आणि सत्यम हे आई-वडिलांची परिस्थितीचे भान ठेवून शिक्षण घेत होते शंभर टक्के योगदान शिक्षणात होते. शिक्षक आणि संस्थेची वाहवा मिळवत होते. क्रमशःPart -2

अपर पोलीस अधिक्षक डी .डी .गवारे (ACB)