CRIME BORDER | 17 November 2026 | 09:35 AM
ठाणे :- इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत संचालित कल्याण (जि. ठाणे) येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करीता बारावीनंतर उच्चशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून ऑफलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
या वसतिगृहात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत निवासव्यवस्था, भोजन भत्ता आणि निर्वाह भत्ता यांसारखे महत्त्वाचे आर्थिक लाभ देण्यात येतात. ठाणे जिल्ह्यात शिक्षण घेणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांसाठी या वसतिगृहात विविध अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक संचालक नावजी सरकुंडे यांनी केले आहे. प्रवेश अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून, प्रवेशाबाबतची सविस्तर व अधिक माहिती सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, ठाणे यांचे कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चौथा मजला, दत्तवाडी, कळवा, जि. ठाणे या कार्यालयात उपलब्ध आहे.