CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

बालकांना न्यूमोनियापासून संरक्षण देण्यासाठी ठाणे जिल्ह्यात ‘SAANS Campaign २०२६-२७’ सुरू

१२ नोव्हेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ दरम्यान प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृतीवर भर

CRIME BORDER | 17 November 2026 | 09:42 AM

बालकांना न्यूमोनियापासून संरक्षण देण्यासाठी ठाणे जिल्ह्यात ‘SAANS Campaign २०२६-२७’ सुरू

ठाणे :- पाच वर्षांखालील बालकांचे न्यूमोनियापासून संरक्षण करणे, न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यू कमी करणे आणि पालकांमध्ये आजाराबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्ह्यात ‘SAANS Campaign २०२६-२७’ या विशेष मोहिमेला सुरुवात झाली आहे. ‘न्यूमोनिया नाही, तर बालपण सही!’ हे या मोहिमेचे घोषवाक्य असून, १२ नोव्हेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत ग्रामीण व शहरी आरोग्य यंत्रणेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या तांत्रिक मार्गदर्शन व पर्यवेक्षणाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.

न्यूमोनिया हा पाच वर्षांखालील बालकांमध्ये आढळणारा गंभीर आजार असून, वेळेत निदान व योग्य उपचार न मिळाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे संरक्षण, प्रतिबंध आणि उपचार या त्रिसूत्रीवर मोहिमेत विशेष भर देण्यात येत आहे. जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करणे, पहिले सहा महिने केवळ स्तनपान, त्यानंतर पूरक आहारासह स्तनपान सुरू ठेवणे, वेळापत्रकानुसार लसीकरण व व्हिटॅमिन ‘ए’चा पुरवठा तसेच PCV लसीकरणाचे महत्त्व याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मोहिमेदरम्यान आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका व संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत पाच वर्षांखालील बालकांच्या गृहभेटी घेण्यात येणार आहेत. कमी वजनाने जन्मलेली, मुदतपूर्व जन्मलेली तसेच SNCU, NICU आणि NRC मधून उपचार घेऊन घरी परतलेल्या बालकांकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. खोकला, जलद श्वासोच्छ्वास, श्वास घेण्यास त्रास किंवा छाती आत ओढली जाणे यांसारखी लक्षणे आढळल्यास बालकांना आवश्यकतेनुसार जवळच्या आरोग्य संस्थेत संदर्भित करण्यात येणार आहे.

न्यूमोनियाग्रस्त बालकांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व जिल्हा रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधे, ऑक्सिजन सुविधा, पल्स ऑक्सिमीटर, नेब्युलायझर व इतर वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, परिचारिका, आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविकांसाठी प्रशिक्षण व उजळणी सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.

घरातील धूर, स्वयंपाकासाठी लाकूड किंवा कोळशाचा वापर, घरात धूम्रपान करणे, कचरा जाळणे तसेच घरात पुरेशी हवा खेळती नसणे या जोखमीच्या घटकांबाबतही जनजागृती करण्यात येणार आहे.

बालकाला सतत खोकला, जलद श्वासोच्छ्वास, श्वास घेण्यास त्रास, दूध पिण्यास अडचण किंवा छाती आत ओढली जाणे यांसारखी लक्षणे दिसल्यास विलंब न करता जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत तपासणी करून घ्यावी. बालकांचे नियमित लसीकरण पूर्ण करावे, सहा महिन्यांपर्यंत केवळ स्तनपान द्यावे आणि घरातील वातावरण स्वच्छ व धूरमुक्त ठेवावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
०००