CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

दहिवलीत माजी विद्यार्थ्यांचा ‘पुन्हा हजर’ मेळावा उत्साहात संपन्न

CRIME BORDER | 17 November 2026 | 09:48 AM

दहिवलीत माजी विद्यार्थ्यांचा ‘पुन्हा हजर’ मेळावा उत्साहात संपन्न

ठाणे :- ‘ज्या शाळेने आपले आयुष्य घडवले, त्या शाळेसाठी आपणही काहीतरी करूया’ या भावनेतून जिल्हा परिषद केंद्रशाळा दहिवली येथे दि. १५ नोव्हेंबर,२०२६ रोजी माजी विद्यार्थी संघाचा ‘पुन्हा हजर’ मेळावा उत्साहात संपन्न झाला. शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी केला.

मेळाव्याची सुरुवात राष्ट्रगीत व प्रार्थनेने झाली. मुख्याध्यापिका सरोजा मांडके यांनी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सोमनाथ सुरोसे, उपाध्यक्ष भरत देशमुख तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य महेंद्र सुरोसे, भानुदास देशमुख व बाळकृष्ण मुंडे यांचे पुष्पगुच्छ, रजिस्टर व पेन देऊन स्वागत केले.

यावेळी शिक्षक भरत वेखंडे यांनी माजी विद्यार्थी संघाच्या स्थापनेसंदर्भातील शासन परिपत्रक, संघाची कार्ये व उद्दिष्टे याबाबत पीपीटीच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली. जिल्हा परिषद, ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करून शाळांच्या विकासात माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मेळाव्यात शाळेसमोरील नादुरुस्त व धोकादायक इमारत तसेच शाळेच्या जागेच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. माजी विद्यार्थी संघाने जागा मालकाशी चर्चा करून या प्रश्नावर तोडगा काढला आहे. मूळ मालकाच्या नावे असलेल्या जागेतील निम्मी जागा शाळेसाठी आणि निम्मी जागा मूळ मालकासाठी ठेवण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच शाळेच्या जागेसाठी संरक्षक भिंत, किचन शेड आणि रंगमंच उभारून देण्याचे आश्वासन माजी विद्यार्थी संघाने दिले.

माजी विद्यार्थी भरत देशमुख यांनी शाळेसाठी पंखे बसवून दिले असून, एका वर्गातील लाईट फिटिंगचे कामही पूर्ण करून दिले आहे. तसेच वर्ग सजावटीचे काम सुरू केले आहे. त्यांच्या या योगदानाचे उपस्थितांनी कौतुक केले.

शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही योगदान देण्याचा निर्धार करत ‘पुन्हा शाळेत लवकर येऊया’ या संकल्पाने मेळाव्याची सांगता झाली. यावेळी माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००