CRIME BORDER | 17 November 2026 | 10:27 AM
जळगाव (क्राईम बॉर्डर) :- शैक्षणिक, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत कंडारी हायस्कूल, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव येथील मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखाताई पाटील यांना नुकताच प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार २०२६ प्रदान करून गौरविण्यात आले.
श्रीमती सुरेखाताई पाटील या भुसावळ येथे स्थायिक असलेल्या तसेच जामनेर तालुक्यातील बेटावद बुद्रुक येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये अनेक वर्षे शैक्षणिक सेवा बजावलेल्या दिवंगत जे. एस. पाटील सर यांच्या कन्या आहेत. वडिलांकडून मिळालेला शैक्षणिक वारसा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व विविध विभागांतील उल्लेखनीय कार्याची दखल मुख्याध्यापक महासंघाने घेत त्यांना या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या या यशामुळे शिक्षकवर्गात आनंदाचे वातावरण असून शिक्षण क्षेत्रासह विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या गौरवपूर्ण यशाबद्दल श्रीमती सुरेखाताई पाटील यांचे क्राईम बॉर्डर, श्री स्वामी सखा (मासिक), आश्रय महिला संस्था, पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट आणि भरोसा फाउंडेशन यांच्या वतीने श्री. राजेंद्र व सौ. सीमा राजेंद्र वखरे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक, सामाजिक आणि समाजोपयोगी कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.
त्यांच्या हातून भावी काळातही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आणि समाजसेवेची अशीच अखंड सेवा घडत राहो, हीच सदिच्छा!