CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आणखी एक संधी

CRIME BORDER | 21 November 2026 | 09:36 AM

अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आणखी एक संधी

मा. भारत निवडणूक आयोग यांच्याकडील निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा (SIR) कार्यक्रम जाहीर झालेला आहे.

सद्यस्थितीत सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत, ज्या मतदारांना गणना प्रपत्र निर्गमित करुनही त्यांची नावे ASDD (Absence, Shifted, Dead, Duplicate) या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आल्यामुळे प्रारुप मतदार यादीमध्ये समाविष्ट करता आलेली नाहीत, अशा मतदारांना त्यांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी आणखी एक संधी देण्याचा निर्णय मा. भारत निवडणूक आयोगाने घेतला आहे.

त्यानुसार दि. 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत गणना प्रपत्रांचे (EFs) वितरण व संकलन केले जाणार असून 10 डिसेंबर 2026 पर्यंत गणना प्रपत्रे निकाली काढण्यात येणार आहेत, याची नोंद घ्यावी असे मतदार नोंदणी अधिकारी, बेलापूर व ऐरोली यांचेमार्फत सूचित करण्यात आले आहे.