CRIME BORDER | 21 November 2026 | 09:40 AM
शहापूर :- तालुक्यातून एक संतापजनक आणि निंदनीय घटना समोर आली आहे. आसनगाव परिसरात 6 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या तरुणाने अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, शेजारी राहणाऱ्या 30 वर्षीय तरुणाने मुलीला खाऊ देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केला आणि ही गोष्ट कोणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.