CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

मैत्रिणीच ठरली विश्वासघातकी! १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचाराचा आरोप; भाईंदरमधील संतापजनक घटना

CRIME BORDER | 21 November 2026 | 10:41 AM

मैत्रिणीच ठरली विश्वासघातकी! १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचाराचा आरोप; भाईंदरमधील संतापजनक घटना

भाईंदर | क्राईम बॉर्डर न्यूज पोर्टल
मैत्रीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना भाईंदरमध्ये उघडकीस आली आहे. अवघ्या १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्याच २५ वर्षीय मैत्रिणीने तीन तरुणांच्या ताब्यात दिल्याचा गंभीर आरोप आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी रात्री पीडितेला भाईंदरमधील विनयनगर परिसरातील एका इमारतीतील फ्लॅटवर नेण्यात आले. तेथे तिला जबरदस्तीने मद्य पाजण्यात आल्याचा आरोप असून, त्यानंतर दोन तरुणांनी पहाटे सहा वाजेपर्यंत तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, पीडिता बेशुद्धावस्थेत असताना तिच्या गळ्यातील अंदाजे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेनही लंपास करण्यात आल्याचा आरोप आहे. 


या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर १९ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू तपास सुरू असून, या संतापजनक प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.