CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेना सरसावली! सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी चांदवड तहसीलदारांची घेतली भेट

CRIME BORDER | 21 November 2026 | 10:52 AM

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेना सरसावली! सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी चांदवड तहसीलदारांची घेतली भेट

क्राईम बॉर्डर न्यूज पोर्टल :- आशिष आहेर 

चांदवड : - परिसरातील दुष्काळग्रस्त नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे सचिव श्री. भाऊसाहेब चौधरी यांनी चांदवड येथे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान दुष्काळग्रस्त शेतकरी व नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.


दुष्काळग्रस्तांना पाणीटंचाई, शेतीविषयक अडचणी आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाने संवेदनशीलतेने लक्ष देऊन योग्य ती मदत व उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याच्या या भूमिकेचे परिसरातून स्वागत होत आहे.

 

क्राईम बॉर्डर न्यूज पोर्टल
पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे!