CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

जनतेचे प्रश्न केवळ ऐकण्यासाठी नव्हे, तर ते सोडवण्यासाठी जनता दरबार! झडपोली येथे नागरिकांशी थेट संवाद;

समस्यांच्या निवारणासाठी संबंधित अधिकार्‍यांना कार्यवाहीच्या सूचना

CRIME BORDER | 22 November 2026 | 05:19 PM

जनतेचे प्रश्न केवळ ऐकण्यासाठी नव्हे, तर ते सोडवण्यासाठी जनता दरबार! झडपोली येथे नागरिकांशी थेट संवाद;

झडपोली : जनतेच्या समस्या जाणून घेणे आणि त्या प्रत्यक्ष मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणे, या उद्देशाने झडपोली येथील कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबाराच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या विविध समस्या, तक्रारी आणि प्रलंबित प्रश्न जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांनी स्वतः जाणून घेतले.
यावेळी नागरिकांनी आपल्या परिसरातील विविध नागरी समस्या आणि प्रलंबित कामांबाबत मते मांडली. प्रत्येक नागरिकाचे म्हणणे जाणून घेत संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारी व्यवस्था खपवून घेतली जाणार नसल्याचा ठाम संदेश देत संबंधित विभागांच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांनी केल्या.
जनता दरबार म्हणजे केवळ नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्याचा उपक्रम नसून, त्यांच्या समस्या प्रत्यक्ष निकाली काढण्यासाठी उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. नागरिकांचे प्रश्न सुटेपर्यंत त्यांचा सातत्याने पाठपुरावा करणे, हीच आमची कार्यपद्धती असल्याचे यावेळी निलेश सांबरे यांनी स्पष्ट केले.


जनतेच्या हक्कांसाठी आवाज उठवणे, अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहणे आणि विकासाच्या प्रत्येक प्रश्नावर संबंधित यंत्रणांना जाब विचारणे, ही भूमिका कायम राहणार आहे. जिजाऊचे सेवाकार्य हे केवळ आश्वासनांपुरते मर्यादित नसून प्रत्यक्ष कृतीतून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी संस्था सदैव कटिबद्ध असल्याचा निर्धारही व्यक्त यावेळी व्यक्त केला.
या जनता दरबाराला परिसरातील नागरिकांसह जिजाऊचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देणारा आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला कृतीशील बनविणारा हा जनता दरबार नागरिकांसाठी दिलासादायक ठरला.