CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

अनोखा योगायोग! वडील आणि दोन्ही लेकींचा जन्म एकाच दिवशी; २२ नोव्हेंबरचा दिवस ठरला तिहेरी आनंदाचा सोहळा!

CRIME BORDER | 22 November 2026 | 05:41 PM

अनोखा योगायोग! वडील आणि दोन्ही लेकींचा जन्म एकाच दिवशी; २२ नोव्हेंबरचा दिवस ठरला तिहेरी आनंदाचा सोहळा!

क्राईम बॉर्डर न्यूज पोर्टल मुंबई प्रतिनिधी :- कुटुंबातील प्रत्येकाचा वाढदिवस हा आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण असतो. मात्र, एकाच कुटुंबातील वडील आणि त्यांच्या दोन्ही मुलींचा जन्म एकाच तारखेला झालेला असणे, हा खरोखरच एक दुर्मिळ आणि अनोखा योगायोग म्हणावा लागेल!

क्राईम बॉर्डरचे मुंबई विभागीय संपादक अभिषेक मेढेकर यांचा वाढदिवस २२ नोव्हेंबर रोजी असतो. विशेष म्हणजे, त्यांची मोठी कन्या कु.अन्वी हिचा ८ वा वाढदिवस आणि लहान कन्या कु.असरी हिचा ६ वा वाढदिवसही याच दिवशी असतो.

त्यामुळे दरवर्षी २२ नोव्हेंबर हा दिवस मेढेकर कुटुंबासाठी तिहेरी आनंदाची पर्वणी घेऊन येतो. वडील आणि दोन्ही लाडक्या लेकींचा वाढदिवस एकाच दिवशी साजरा होण्याचा हा अनोखा संगम कुटुंबातील आनंद द्विगुणित करणारा आहे.

आज, दिनांक २२ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे मेढेकर कुटुंबातर्फे तिन्ही वाढदिवसांचा सोहळा अत्यंत आनंदी आणि कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यात येत आहे. एकाच दिवशी तीन वाढदिवस, तीन आनंदाचे क्षण आणि कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील हास्य, असे हे आनंदाचे सुंदर चित्र पाहायला मिळत आहे.

या अनोख्या योगायोगानिमित्त अभिषेक मेढेकर, कु. अन्वी आणि कु.असरी या तिघांनाही क्राईम बॉर्डर परिवार महाराष्ट्र राज्यातर्फे वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!