CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेच्या अवमानाचा जामनेर शिवसेनेतर्फे तीव्र निषेध! तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन;

अॅड. प्रकाश पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा संताप

CRIME BORDER | 22 November 2026 | 06:14 PM

बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेच्या अवमानाचा जामनेर शिवसेनेतर्फे तीव्र निषेध! तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन;

क्राईम बॉर्डर न्यूज पोर्टल जामनेर प्रतिनिधी :- शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एन. सी. यांनी वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ जामनेर तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात जामनेरचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.


यावेळी अॅड. प्रकाश पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत, बाळासाहेब ठाकरे हे लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असून त्यांच्या प्रतिमेचा अवमान करणे म्हणजे शिवसैनिकांच्या भावनांना ठेच पोहोचविणे होय. असा अवमान सहन केला जाणार नाही, अशी भूमिका मांडली. संबंधित प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली.


यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख सुधाकर शेठ सराफ, विष्णू सोनवणे, शामराव तुकाराम पाटील, प्रकाश सूर्यवंशी, अशोक जाधव, शेंदुर्णी शहरप्रमुख युवराज बारी, अशोक बारी, उस्मान भाई, संजय कुमावत, योगेश चव्हाण, गणेश गजमल चव्हाण, गोरे पेंटर, अरुण भालेराव, संतोष वसाने, भावराव गोंधनखेडे व दिलीप तेली यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.