CRIME BORDER | 23 November 2026 | 09:24 AM
ठाणे : - लोकसभा निवडणुकीनंतरही जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे समाजकार्य थांबलेले नसून, लोकसभा निवडणुकीदरम्यान नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण करत संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी शहापूर येथे मोफत रुग्णालय सुरू केले आहे. आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासाच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना मदत करण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे. दरम्यान, दरम्यान, आगामी ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री. निलेश सांबरे यांनी संघटनात्मक बांधणी आणि निवडणूकपूर्व तयारीला वेग दिला आहे. याच अनुषंगाने नुकतीच कांबे जिल्हा परिषद गटातील चिबीपाडा येथे तसेच अंजूर जिल्हा परिषद गटातील अंजूर येथे कार्यकर्ता बैठका आयोजित करण्यात आल्या.
शहापूर येथे मोफत रुग्णालय सुरू झाल्याने ठाणे जिल्ह्यातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, गरजू रुग्णांना आता उपचारासाठी दूरच्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासने प्रत्यक्ष कृतीतून पूर्ण होत असल्याचे पाहून नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. समाजासाठी सातत्याने काम करणार्या अशा उपक्रमांची ग्रामीण भागाला मोठी गरज असल्याचेही स्थानिक नागरिकांनी सांगितले.
या बैठकांना कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने गटनिहाय नियोजन, संघटनात्मक मजबुती, कार्यकर्त्यांच्या जबाबदार्या, स्थानिक प्रश्न आणि जनसंपर्क वाढविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनीही स्थानिक पातळीवरील प्रश्न, नागरिकांच्या अपेक्षा आणि आगामी काळातील संघटनात्मक कामाबाबत आपली मते मांडली. लोकसभा निवडणुकीनंतरही समाजकार्याचा वेग कायम ठेवत दिलेली आश्वासने पूर्ण करणे आणि दुसरीकडे आगामी ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी संघटनात्मक तयारी करणे, या दोन्ही स्तरांवर निलेश सांबरे यांनी काम सुरू ठेवले आहे.