CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

खुनाच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना पुसेगाव ,जळगाव पोलीसांच्या संयुक्त कारवाईत अटक,चिंचणी येथून घेतले ताब्यात!

CRIME BORDER | 27 November 2026 | 11:21 AM

खुनाच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना पुसेगाव ,जळगाव पोलीसांच्या संयुक्त कारवाईत अटक,चिंचणी येथून घेतले ताब्यात!

सातारा  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील तीन संशयित आरोपींना पुसेगाव व जळगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सातारा जिल्ह्यातील चिंचणी (ता. खटाव) येथून ताब्यात घेतले. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे गुन्हे तपासात महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.

अमळनेर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 562/2026, भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 109 व 3(5) अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यातील  संशयित आरोपी नामे : विपुल किरण गोसावी ,मयूर अनिल बोरसे ,सागर संजय गोसावी (तिघेही रा. नागाव, ता. अमळनेर, जि. जळगाव) हे तिन्ही  संशयित आरोपी सातारा जिल्ह्यातील चिंचणी, ता. खटाव येथे लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पुसेगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक कोमल शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. अमळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे हे आपल्या पथकासह कारवाईत सहभागी झाले. तसेच पुसेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव, अविनाश घाडगे, शंकर गलंडे, शुभम निगडे व समाधान चव्हाण यांनी संयुक्तरीत्या ही मोहीम राबवली.

पोलिसांनी तत्परतेने हालचाली करत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे जळगाव आणि सातारा जिल्ह्यातील पोलिसांमधील समन्वय व गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या प्रभावी पोलिसिंगचे दर्शन घडले आहे.

गंभीर गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायद्याच्या चौकटीत कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

क्राईम बॉर्डर न्यूज पोर्टल

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे!