CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

संस्था कार्य :- क्राईम बॉर्डर व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन,आश्रय महिला संस्थेच्या संयुक्त विद्यमाने घेसर गावातील वीट भट्टीवर काम करणाऱ्या आदिवासी कुटुंबांची वैद्यकीय तपासणी शिबिर व साहित्य वाटप जनजागृती

CRIME BORDER | 26 December | 01:20 PM

डोंबिवली :- ''चला पेटवू या दिवे ज्या ठिकाणी अजूनही अंधार आहे.'' हे ब्रीदवाक्य घेऊन क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (NGO) व आश्रय महिला संस्था तसेच मीडिया पार्टनर क्राईम बॉर्डर व श्री स्वामी सखा (मासिक) यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच यावर्षी ''वंदे मातरम्'' या अमर राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने वीट भट्टीवर काम करणाऱ्या आदिवासी कुटुंबांची वैद्यकीय तपासणी शिबिर व साहित्य वाटप जनजागृती कार्यक्रम दि. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २. ३० वाजेपासून ते रात्री ८. ०० वाजेपर्यंत घेसर गावाजवळील अंकुश पाटील यांच्या वीट भट्टीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पहिल्या सत्रात प्राथमिक आरोग्य केंद्र निळजे च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुस्मिता कैमल व त्यांच्या सहकाऱ्यांनी वीट भट्टीवरील काम करणाऱ्या महिला, पुरुष ,मुलं , मुली अशा कुटुंबांची आरोग्य तपासणी केली व औषधे दिली. यामध्ये गरोदर माता चेकअप ,नियमित लसीकरण, बीपी , शुगर (मधुमेह), क्षयरोग ,कुष्ठरोग तपासणी, मोतीबिंदू, सिकलसेल यांची तपासणी करून औषधे देण्यात आले तर गरोदर मातांचे लसीकरण रुग्णालयात करण्यात आले. तर दुसऱ्या सत्रात वीट भट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबांना एकत्र करून त्यांच्यासोबत सामाजिक संवाद साधून त्यांना ब्लॅंकेट वाटप सॅनिटरी पॅड व मुलांसाठी शैक्षणिक साहित्य व खाऊ चे वितरण अतिथींच्या हस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रम वीट भट्टीवर काम करणारे आदिवासी बांधव हे गरीब आहेत म्हणून त्यांना फक्त मदत म्हणून नव्हे तर त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास कसा उंचावता येईल याबाबत मार्गदर्शन करून जनजागृती करण्यासंदर्भात आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमाचे आयोजन क्राईम बॉर्डर व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) चे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वखरे यांनी केले होते तर सदर कार्यक्रमाची संकल्पना ही आश्रय महिला संस्थेच्या अध्यक्षा तसेच श्री स्वामी सखा (मासिक) च्या संपादिका सौ..सीमा राजेंद्र वखरे यांची होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहिल्या सत्रातील वैद्यकीय शिबिराचे उद्घाटन मोदी पंपस् चे एमडी सी. बी.सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. तर दुसऱ्या सत्रातील कार्यक्रमाचे उद्घाटन डोंबिवली विभागाचे एसीपी सुहास हेमाडे यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांचे राजेंद्र वखरे व सौ. सीमा वखरे यांनी शाल व तुळस देऊन स्वागत केले

श्री. सुहास हेमाडे सहाय्यक पोलीस आयुक्त ,डोंबिवली विभाग यांनी व्यसनमुक्तीवर तसेच बालविवाह चे दुष्परिणाम तसेच अंधश्रद्धा निर्मूलन बाबत मार्गदर्शन केले. श्री . गणेश जवादवाड ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामनगर यांनी आपल्यावर अन्याय झाल्यास पोलीस स्टेशनला तक्रार कशी नोंदवायची तसेच लहान मुलांवर अत्याचार झाल्यास तत्काळ पोलीस स्टेशन ला माहिती द्यावी यावर मार्गदर्शन केले.

श्री. जयेंद्र भोयर सहाय्यक पोलीस निरिक्षक टिळकनगर यांनी महाराष्ट्रात आदिवासी समाजात ४६ जमाती येत असून त्यापैकी कातकरी जमात ही एक आहे. ही जमात मुंबई सारख्या प्रगतशील शहराजवळ वास्तव्यास असून या जमाजीचा विकास का झाला नाही? तर त्याचे मुख्य कारण व्यसन आणि अशिक्षितपणा असल्याचे सांगितले. या समाजाचा विकास करायचा असेल तर सर्वांत आधी व्यवसनापासून लांब राहून मुलांना शिक्षण देणे, कमावलेल्या मिळकतीतून बचत करणे आवश्यक असल्याचे सांगून गडचिरोली, गोंदिया, अमरावती नंदुरबार, नाशिक, पालघर सारख्या अतिदुर्गम भागात राहुन नोकरी करणाऱ्या आदिवासी बांधवाचे उदाहरण देऊन शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले व आदिवासी समाजाला मिळणाऱ्या शासकीय योजनेची माहिती दिली.

तर सामुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सौ. मेघा चव्हाण यांनी महिलांना गर्भावस्थेतील काळजी, नवजात बालकाला स्तनपानाचे महत्त्व, सकस आहाराअभावी बालकांचे कुपोषण कसे होत असते याबाबत मार्गदर्शन केले . अशा प्रकारे जनजागृती करण्यात आली.

सदर कार्यक्रमाला डोंबिवली विभागाचे एसीपी सुहास हेमाडे (कार्यक्रमाचे अध्यक्ष) , मानपाडा पोलीस स्टेशनचे व. पो. निरी. संदिपान शिंदे ,रामनगर डोंबिवली पोलीस स्टेशनचे व. पो. निरी. गणेश जवादवाड, टिळक नगर पोलीस स्टेशनचे एपीआय जयेंद्रकुमार भोयर, मोदी पंपस् चे एमडी .सी. बी. सिंग ,ऑल इंडिया रेडिओ च्या प्रसिद्ध निवेदिका सौ.हर्षदा प्रभू ,रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस बंधू निलेश पाटील तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र निळजेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुस्मिता कैमल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

तर एसीपी कार्यालयातील पो. ना. सौ .सारिका माने ,क्राईम बॉर्डर चे प्रबंध संपादक महेश भोईर, सहसंपादक संतोष भोईर, उपसंपादक कैलास झोडगे, क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रांताध्यक्ष सौ.चित्रा उर्फ श्रावणी कामत , आश्रय महिला संस्थेच्या सल्लागार सौ. माधुरीताई भोयर,कु. अवनी भोयर, स्वयंसेवक सौ. श्रेया कोलंबकर, क्राईम बॉर्डर चे विशेष प्रतिनिधी संतोष कोलंबकर,

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्सचे प्रेसिडेंट बॉबी पिंटो, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स चे सचिव उज्वल ठोंबरे तसेच रोटेरियन शैलेश गोर , रोटेरियन निलेश सोनवणे तसेच समाजसेवक एन. ए .कदम त्याचबरोबर वीट भट्टी चालक अंकुश पाटील व संदीप मंगरूळकर, तसेच संदीप लक्ष्मण गावड ,सौ. छाया गावड, वैद्यकीय कर्मचारी सिस्टर सौ. पूजा गुरुनाथ चव्हाण, लॅबरोटरी टेक्निशियन सौ. रश्मी जोशी , आरोग्य सहाय्यक नितीन चौधरी तसेच नागरिक प्रमोद भंडारी, अरविंद पाटील , व नागरिक उपस्थित होते. वीटभट्टी वरील आदिवासी बांधव यांच्या कुटुंबासमवेत जेवनाचा आस्वाद घेउन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सीमा राजेंद्र वखरे यांनी केले तर कार्यक्रमाची प्रस्तावना राजेंद्र वखरे यांनी मांडली तर कार्यक्रमाच्या शेवटी आभार राजेंद्र वखरे यांनी मानले.