CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

ट्रम्प यांच्या प्रचार सभास्थळी राडा : वर्णद्वेष विरोधी जोरदार आंदोलन

CRIME BORDER | 26 December | 01:29 PM

टुल्सा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची करोनाचा संसर्ग आणि वर्णद्वेषी आंदोलन सुरू झाल्यानंतर पहिली सभा टुल्सामध्ये पार पडली.आंदोलक आणि ट्रम्प समर्थक यांच्यात या सभेपूर्वी जोरदार राडा झाला. - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक महिन्यांच्या खंडानंतर शनिवारी घेतलेल्या पहिल्या प्रचारसभेला समर्थक आणि कृष्णवर्णीय आंदोलकांच्या झटापटीचे गालबोट लागले. करोनाचा प्रादुर्भाव आणि जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या 'ब्लॅक लाइव्ज मॅटर' आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही सभा होत होती.

 

अमेरिके मधील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयश आल्याचा ठपका ट्रम्प यांच्यावर आहे. त्यातच, जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या आंदोलनामुळे ट्रम्प आरोपांच्या जाळ्यात अडकले आहेत. लॉकडाउनच्या काळामध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचारही थंडावला होता. ट्रम्प यांनी ओकलाहोमा राज्यातील टुल्सा येथे शनिवारी पहिली सभा आयोजित केली होती. सध्याच्या तणावामुळे प्रचारसभेवेळी हिंसाचार होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. त्या अंदाजानुसार शनिवारी सकाळपासूनच शहराच्या सर्वच भागांमध्ये आंदोलक जमले होते. अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. काही ठिकाणी आंदोलक आणि ट्रम्प यांचे समर्थक आमनेसामने येत होते आणि घोषणाबाजी करत होते. सायंकाळनंतर एका सशस्त्र गटाने आंदोलकांचा पाठलाग केला. आंदोलकांनी त्यांना घेरले असता, त्यातील एकाने 'पेपर स्प्रे' फवारला. पोलिसांनीही अश्रुधूर फवारून जमाव पांगवला.

 

ही सभा आधी केंद्राबाहेरील मोकळ्या मैदानात होणार होती. मात्र, ती रद्द करण्यात आली. रद्द करण्यामागील कारण सांगण्यात आले नाही. या सभेला फक्त ट्रम्प आणि उपाध्यक्ष माइक पेन्स उपस्थित होते. परिसरातील गर्दी कमी करताना, अडथळे आणल्यामुळे पोलिसांनी एका महिलेला अटक केली.रिकाम्या खुर्च्यांची छायाचित्रे व्हायरल ही सभा १९ हजार क्षमतेच्या बीओके केंद्रामध्ये आयोजित करण्यात आली होती. करोनाच्या प्रादुर्भावामुळे, बंदिस्त केंद्रामध्ये मार्चनंतर होणारा हा सर्वांत मोठा कार्यक्रम होता. या सभेला उपस्थित बहुतांश समर्थकांनी मास्क घातला नव्हता. हे केंद्र बहुतांशपणे रिकामे होते. प्रवेशद्वारांच्या परिसरात असणाऱ्या आंदोलकांनी बहुतांश समर्थकांना सभेला येण्यापासून रोखल्याचा आरोप ट्रम्प यांच्या प्रचार अधिकाऱ्यांनी केला. ट्रम्प यांचे भाषण सुरू असतानाही, अनेक आंदोलकांनी कागदी सुरे दाखवत निषेध नोंदवला. सोशल मीडियावरही रिकाम्या खुर्च्यांची छायाचित्रे व्हायरल झाली होती.