CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

एकपात्री अभिनय स्पर्धा वर्ष ८ वे डोंबिवली येथे संपन्न.

13 December 2025 10:20 PM

CRIME BORDER | 17 December 2025 | 12:58 PM

एकपात्री अभिनय स्पर्धा वर्ष ८ वे डोंबिवली येथे संपन्न.


डोंबिवली : डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन – सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊस आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धा वर्ष ८ चे दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी, डोंबिवली पश्चिम येथील रोटरी भवन बिल्डिंग, २रा मजला येथे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध अभिनेते व रंगकर्मी अशोक हंगर सर यांनी केले.


सदर स्पर्धेमध्ये अनेक कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला व आपली कला सादर केली. डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग व दुर्वा एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे, रोख रक्कम तसेच प्रमाणपत्र परीक्षकांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यासोबतच काही कलाकारांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्रे देखील देण्यात आली.


स्पर्धेत सहभागी सर्व कलाकारांचे परीक्षण परीक्षक अशोक हंगर सर यांनी अतिशय बारकाईने केले. अभिनयातील विविध पैलूंवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवसंपन्न सूचनांमुळे सहभागी कलाकारांना भविष्यासाठी प्रेरणा मिळाली आणि सर्व कलाकार आनंदी व समाधानी दिसून आले.


संस्थेचे संस्थापक व स्पर्धेचे आयोजक डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सपकाळ यांनी सर्व सहभागी कलाकारांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व भविष्यात अशा उपक्रमांचे सातत्य राखले जाईल, असे आश्वासन दिले.