CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

भरधाव ट्रकचे स्टिअरिंग जाम झाल्याने उड्डाणपुलाजवळ ट्रक दुभाजकावर आदळला

10 November 2025 03:32 PM

CRIME BORDER | 18 December 2025 | 09:48 AM

भरधाव ट्रकचे स्टिअरिंग जाम झाल्याने उड्डाणपुलाजवळ ट्रक दुभाजकावर आदळला

कल्पेश चौधरी /सुरेश कोळी 

भुसावळ : जळगाव वरून  वरणगावकडे लाकडी पाट्यांची वाहतूक करणारा ट्रक - आरजे.१८-जीबी.७२९५- पहाटे पहाटे अचानक स्टिअरिंग जाम झाल्याने उड्डाणपुलाजवळ दुभाजकावर जाऊन आदळला. ही घटना पहाटे पहाटे साखरझोपेच्या  सुमारास २.३० वाजता घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ट्रक दुभाजकावर धडकल्याने मोठा आवाज होत पुढील चाक तुटून पडले. अपघातानंतर मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही वेळ मंदावली. रात्रीच्या वेळी ट्रकचा अपघात झाल्याने चालक आणि इतर वाहनचालकांना अडचण निर्माण झाली. मात्र, अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलिस, महामार्ग विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. वाहतुकीला येणारे अडथळे दूर केले.