CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

प्रवाशांचे खिसे कापणारे दोघे जेरबंद -जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

16 November 2025 11:07 AM

CRIME BORDER | 18 December 2025 | 10:04 AM

प्रवाशांचे खिसे कापणारे दोघे जेरबंद -जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Dr. Shashikant Kale


जळगाव  :– मध्य प्रदेशातील बुरहानपुर येथे रिक्षातील प्रवाशांचे खिसे कापून चोरी करणाऱ्या दोघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. वसीम कय्युम खाटीक (मास्टर कॉलनी जळगाव) आणि तौसीफ सत्तार खान (रामनगर जळगाव) अशी या दोघांची नावे आहेत. त्यांना बुऱ्हानपूर कोतवाली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. बुरहानपूर कोतवाली पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध रिक्षातील प्रवाशांचे खिसे कापून चोरी करण्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

हा गुन्हा जळगाव पोलिस रेकॉर्ड वरील गुन्हेगार वसीम कय्युम खाटीक व तौसीफ सत्तार खान या दोघांनी साथीदारांच्या मदतीने केल्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकाच्या मदतीने दोघांना जेरबंद केले.

पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल,  सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हे कॉ अकरम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, किशोर पाटील, रविंद्र कापडणे, राहुल रगडे, नाना तायडे, महेश सोमवंशी यांनी या कामागिरीत सहभाग घेतला.