CRIME BORDER | 18 December 2025 | 10:30 AM
प्रतिनिधी : श्रावणी कामत
लोणावळा : १५० वर्षांपूर्वी बंकीम चंद्र चाटर्जी यांना स्वतंत्र, वैभवशाली, सुसंस्कृत भारत मातेचं स्वप्न पडलं....स्वप्न नव्हे ही जागृती होती......ब्रटिशांच्या सत्तेतून आपल्या भारतमातेस स्वतंत्र करण्याची.अनेक वीरांच्या, कुटुंबाच्या त्यागातून समर्पणातून सिद्ध झालेलं आकारलेले हे गीत म्हणजे भारतमातेचा झालेला साक्षात्कार च म्हणावा लागेल. स्वातंत्र्य संग्रामात अनेकांना प्रेरणादायी ठरले.यातील भाव, आर्तता सर्वांपर्यंत पोहोचावी म्हणून आजच्या कार्यक्रमात मांडलेले विचार आणि मागे स्क्रीन वर दाखवलेले देशभक्त, क्रांतिकारक यांचे फोटो हे खूप प्रभावशाली ठरले.
अनेकांच्या त्यागातून स्वतंत्र झालेल्या भारत मातेला स्वच्छ सुंदर ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे प्रबोधनही करण्यात आले.वंदे मातरम आणि जन गण मन अत्यंत सुरेल आवाजात तालबद्ध रीतीने वाद्यवृंदाने सादर केले त्यांच्या सुरात हजारो सूर एकत्रित झाले.जसे १५० वर्षांपूर्वी 'वंदे 'म्हणताच 'मातरम 'म्हणून सारे भारतवासीय एकत्र आले तसेच आत्ताही आजच्या या वंदेमातरम दिनाच्या कार्यक्रमाला प्रतिसाद देण्यासाठी हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि समस्त नागरिक एकत्र आले.आणि सुसंस्कारीत, शब्द सुरांची सुसंगती साधून मनामनाचे प्रबोधन करणारा हा तेजस्वी राष्ट्रभक्ती पर सोहळा संपन्न झाला.
नविन पिढीला ही प्रेरणा दायी ठरले माते तुला वंदन असो ' असा साधा सरळ शब्द असलेल्या गीताने प्रखर राष्ट्रप्रेम भारतीयांच्या नसानसात भिनले. असेच राष्ट्रप्रेम कायम प्रेरणा देत रहाणार.
.
या वेळी प्रमुख वक्ते मा. श्री. शिरीष पटवर्धन यांनी मुलांना वंदे मातरम चा अर्थ आणि त्याची व्याख्या हे समजलं अतिशय असा सुंदर हा कार्यक्रम पार पडला .आनंद गावडे यांनी लोणावळा नगरपरिषद, हिंदू समिती,शिवसेवा प्रतिष्ठान, मावळ वार्ता फाउंडेशन, शिवदुर्ग मित्र, आय. टी. आय, पत्रकार बंधू बघिणी व आलेले सगळे मान्यवर यांचे आभार मानले.