CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

एमपीएससी करणाऱ्या नितीनने नर्स प्रेयसीसह घेतला धक्कादायक निर्णय!‘एकत्र जगू, एकत्र मरू…’

CRIME BORDER | 18 December | 05:13 AM

Saysing Padvi

आंबेजोगाई : एकत्र जगू, एकत्र मरू… अशी आण घेऊन त्यांनी आपल्या प्रेम प्रवासाला सुरुवात केली. मात्र, त्यांच्या नात्याला घरच्यांनी विरोध केला. यामुळे दुखावलेल्या दोघांनी गळफास घेऊन आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पोलीस सूत्रानुसार, नितीन दराडे आणि राणी दराडे अशी आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलाची नावे आहेत. नितीन हा शारीरिकदृष्ट्या दिव्यांग होता. तो गेल्या तीन वर्षांपासून एमपीएस्सीची तयारी करत होता. तर, राणी ही नर्स म्हणून एका खासगी रुग्णालयात काम करत होती.

दोघेही नातेवाईक असून, त्यांच्यात प्रेम संबंध होते. मात्र, त्यांच्या नात्याला घरच्यांनी विरोध केला. यामुळे दुखावलेल्या दोघांनी गळफास घेऊन आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ऐन दिवाळीत दराडे कुटुंबात दुःख

ऐन दिवाळीत दराडे कुटुंबात दुःखद घटना घडली असून, या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. लातूरच्या बुधडा पेठ येथे ही घटना घडली असून, दोघेही बीडच्या आंबेजोगाई येथील असल्याची समोर आली आहे. नितीन हा अहमदपूर येथे एमपीएस्सीची तयारी करत होता. तर, राणी ही नर्स म्हणून लातूरमधील एका खासगी रुग्णालयात काम करत होती.

दरम्यान, या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. याबाबत पोलिसात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.साभार तरुण भारत