CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

पंजाबचे माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा : मुलाच्या मृत्यू प्रकरणात दोषी असल्यास फाशीची शिक्षा भोगण्यास तयार

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

पंजाबचे माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा : मुलाच्या मृत्यू प्रकरणात दोषी असल्यास फाशीची शिक्षा भोगण्यास तयार

पंजाबचे माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा यांचा मुलगा अकील याने त्याच्या मृत्यूपूर्वी कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. या व्हिडिओवरून मोहम्मद मुस्तफा यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला.

सहारनपूर (उत्तर प्रदेश): पंजाबचे माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा यांनी त्यांचा मुलगा अकील अख्तर यांच्या मृत्यूबाबत अखेर मौन सोडलं आहे. त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर त्यांच्यासह पत्नी रजिया सुलताना, मुलगी आणि सून यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राजकारणातून आरोप झाल्याचा माजी डीजीपी मुस्तफा यांनी दावा केला.

मुस्तफा यांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत म्हटलं, पिता म्हणून सहन करता येणार नाही, असे प्रचंड दु:ख आहे. अकील १८ वर्षांपासून अमली पदार्थांच्या व्यसनाशी झुंजत होता. अमली पदार्थाच्या अतिसेवनानं त्याचा मृत्यू झाला.

मुलाच्या मृत्यूनंतर माझ्या आतल्या सैनिकाला संकुचित विचारसरणीच्या लोकांविरुद्ध उभे राहण्यासाठी भाग पाडलं आहे. मुलानं कितीही चुका केल्या तरी पिता नेहमीच त्याचं जगापासून रक्षण करतात. असे असले तरी काहींनी या परिस्थितीचा फायदा घेत संकुचित पद्धतीनं राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. त्यामुळे मला भीती नाही. एखाद्या वडिलांनी स्वतःच्या मुलाला मारल्याचं तुम्ही ऐकलं आहे का?, असे मुस्तफा यांनी म्हटलं.

आरोप करणारा आमदाराचा पीए- शमसुद्दीन चौधरी यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याबाबत मोहम्मद मुस्तफा म्हणाले, तो (शमसुद्दीन चौधरी) एका राजकारण्याचा मोहरा बनला आहे. तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेलात तर गुन्हा नोंदवण्याची पोलिसांची जबाबदारी आहे. मी तपासात पूर्ण सहकार्य करणार आहे. जर मी दोषी असेन तर मी फाशीची शिक्षा भोगण्यास तयार आहे. त्यांच्यावरील आरोपांचा संदर्भ देताना माजी डीजीपी म्हणाले, माझ्यावर आरोप करणारा व्यक्ती शमसुद्दीन हा एका आमदाराचा पीए आहे. माझ्या मुलाच्या मृत्यूनंतर आम्हाला खूप दुःख झाले.

घरात आढळला होता मृतदेह- अकील अख्तरचा मृतदेह हा १६ ऑक्टोबर रोजी पंचकुला येथील सेक्टर ४ येथील त्याच्या घरी बेशुद्धावस्थेत आढळला. रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले. व्हिडिओ आणि सोशल मीडिया पोस्ट समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पंचकुलाच्या डीसीपी सृष्टी गुप्ता यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आल्याचं सांगितलं.

SABHAR : By ANI : Published : October 23, 2025 at 8:48 AM IST