CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

मतदार राजा जागा हो.. मतदानासाठी सज्ज हो..!

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

मतदार राजा जागा हो.. मतदानासाठी सज्ज हो..!

 

ठाणे :- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदान टक्केवारी वाढविण्याकरिता व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याबाबत मा. भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्यानुषंगाने ठाणे जिल्ह्यातील २३-भिवंडी, २४-कल्याण व २५-ठाणे या लोकसभा मतदारसंघाकरिता स्वतंत्र स्वीप नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत तसेच जिल्हा कार्यालयातर्फे मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता मतदार जनजागृतीचे वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.

"मतदार राजा जागा हो मतदानासाठी सज्ज हो" या कार्यक्रमाचा शुभारंभ दि.२५ जानेवारी २०२४ रोजी उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या हस्ते ठाणे येथील विवियाना मॉल येथे करण्यात आला होता. तसेच दि.१७ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता ठाणे येथील कोरम मॉल मध्ये संगीत सध्या आणि प्रश्नमंजूषा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले. मतदार नोंदणी करीता नमुना नं.६ चे अर्ज तसेच Voter helpline बाबत माहिती देण्यात आली. उपस्थित नागरिकांना मतदार नोंदणी विषयी प्रश्न विचारण्यात आले व मतदार जनजागृतीकरीता तयार करण्यात आलेले कप वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आगामी काळात देखील असेच जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, असे ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी कळविले आहे.