CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

आरटीई अंतर्गत कोट्यातील प्रवेश प्रक्रिया सुरू;17 मार्चपर्यंत अर्ज करता येणार

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

आरटीई अंतर्गत कोट्यातील प्रवेश प्रक्रिया सुरू;17 मार्चपर्यंत अर्ज करता येणार

ठाणे, : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमाद्वारे जिल्ह्यातील कायम विनाअनुदानित/विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायित शाळांमध्ये सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई अंतर्गत 25 टक्के कोट्यातील प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून ती 17 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex या संकेतस्थळावर अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे.

सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता शिक्षण हक्क अधिनियम (आरटीई) अंतर्गत 25% कोट्यातील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगरपालिका मध्ये एकूण 629 पात्र शाळा असून एकूण १२२७८ रिक्त जागा उपलब्ध आहेत. आरटीई 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex या संकेतस्थळावर १७ मार्च २०२३ रात्री १२.०० वाजेपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालकांसाठी मदत केंद्रांची यादी, ऑन लाईनप्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका, आवश्यक कागदपत्रे इत्यादीबाबत सर्व माहिती शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या जास्तीत जास्त बालकांच्या अर्जांची नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. कारेकर यांनी केले आहे.

पात्र शाळा व बालक

पात्र शाळा :- विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थ सहाय्यित शाळा (अल्पसंख्याक शाळा वगळून)

पात्र बालक :- 1) वंचित घटक - अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विशेष मागास प्रवर्ग (SBC), विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (व-क-ड) (NT), इतर मागासवर्ग प्रवर्ग (OBC), 2) दुर्बल घटक - एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले घटक. 3) दिव्यांग बालके - 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र असलेले. 4) अनाथ बालक, 5) कोव्हीड प्रभावित बालक. 6) एच. आय. व्ही. बाधित किंवा एस. आय. व्ही. प्रभावित बालके.