CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

अल्पसख्यांक, आर्थिक दुर्बल घटक व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजनांसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

अल्पसख्यांक, आर्थिक दुर्बल घटक व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजनांसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

ठाणे, :- राज्य शिक्षण संचालनालयाच्या वतीने अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती, बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती या शिष्यवृत्तींसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोंबर आहे. विद्यार्थ्यांनी या तारखेपूर्वी https://scholarships.gov.in/ या संकेतस्थळावरून अर्ज करण्याचे आवाहन शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.

शिक्षण संचालनालयाकडे इयत्ता १ ली ते १० वी तील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, इयत्ता ९ वी ते १२ वी फक्त मुलींसाठी बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती, इयत्ता ९वी ते १२वी मधील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती व इयत्ता ९वी व १० वी मधील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती दिल्या जातात. या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक पात्रता व इतर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असून या सर्व योजनांसाठी तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. नुतनीकरणासाठी प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांने अर्ज भरणे आवश्यक आहे, असे शिक्षण संचालक श्री. पाटील यांनी कळविले आहे.