CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
अहंमदनगर (ज्ञानेश्वर सोनवणे) : संत चरित्र ग्रुप आयोजित शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त जागर आदिशक्तीचा ऑनलाईन प्रवचन महोत्सव पर्व आठवे संत चरित्र ग्रुप महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक ह.भ.प.वाल्मीक महाराज जाधव भागवताचार्य ह.भ.प.सौ.कविताताई साबळे व सुप्रसिध्द किर्तनकार ह.भ.प.सौ.शारदाताई सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शना खाली
संत चरित्र ग्रुप निर्माते ज्ञानेश्वर माऊली सोनवणे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यसह संपूर्ण भारत देशातील आदिशक्तीच्या विविध रूपांचे व अवतार कार्याचे प्रयोजन हे ह्या ऑनलाईन प्रवचन महोत्सवात महिला प्रवचनकार मांडणार आहेत. यास्तव ह्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.संत चरित्र ग्रुपच्या राज्य संघटक ह.भ.प.सौ.सवितामाई पगार सौ.अर्चनाताई जामोदे ह्या या कार्यक्रम प्रमुख म्हणुन काम पाहत असुन सर्व भाविकांच्या सहकार्यातून हा ऑनलाईन प्रवचन महोत्सव संपन्न होत असल्याची माहिती संत चरित्र ग्रुपचे महाराष्ट्र राज्य प्रसिद्ध प्रमुख ह.भ.प.रोहीदास महाराज जाधव यांनी दिली आहे .
या ऑनलाईन प्रवचन महोत्सवामध्ये सोमवारपासून महाराष्ट्रातील नामवंत महिला प्रवचनकारांचे प्रवचन गुगल मीट ॲप द्वारे रोज रात्री नऊ ते दहा या वेळेत ऑनलाईन प्रसारितहोत आहे या मध्ये सोमवार दि.२६ सप्टेंबर रोजी विदर्भातील सौ.सुलोचनाताई सुलताने मंगळवार दि.२७ रोजी भागवतानंद कन्या ह.भ.प.सवितामाई दरंदले बुधवार दि.२८ रोजी सांगली येथील सौ.शुभदाताई लोहार गुरुवार दि.२९ रोजी राहुरी येथील ह.भ.प.गितामाई धसाळ शुक्रवार दि.३०रोजी सिन्नर येथील सौ.अलकाताई रानडे शनिवार १ऑक्टोंवर रोजी चांदवड येथील युवा किर्तनकार ह.भ.प.रोहिनीताई ठाकरे रविवार दि.२ रोजी अहमदनगर येथील ह.भ.प.हिराताई मोकाटे सोमवार दि.३ रोजी विदर्भातील गजानन सेवक श्रीमती उषाताई फिरके मंगळवार दि. ४ ऑक्टोबर रोजी समारोपिय प्रवचन सेवा संत चरित्र ग्रुपच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष समाजप्रबोधनकार रामायणाचार्य ह.भ.प.सौ. मिनाताई महाराज मडके यांची होणार असून या प्रवचन महोत्सवाचा सर्वांनी ऑनलाईन लाभ घ्यावा असे महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख ह.भ.प. रोहिदास महाराज जाधव तसेच ह.भ.प.काशिनाथ महाराज मोरे श्री.रावसाहेब जगताप यांनी कळविले आहे.