CRIME BORDER | 17 December 2025 | 01:20 PM
ठाणे : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय रग्बी क्रीडा स्पर्धा २०२५–२६ चे आयोजन दि. २१ ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सेंटुरी रॅयन हायस्कूल येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी उपयुक्त, क्रीडा उल्हासनगर महानगरपालिका श्रीम. रेखा कर्पे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. संतोष आहाड, आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू श्री. सचिन हस्तकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील आठ विभागांमधून मुलामुलींचे एकूण सोळा संघ सहभागी झाले होते. या संघांमधून मुलींच्या गटात लातूर विभागाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून नागपूर तसेच छत्रपती संभाजीनगर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले. तर १४ वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक कोल्हापूर या विभागास प्राप्त झाला असून लातूर व मुंबई या विभागांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले.
ही स्पर्धा अत्यंत उत्साहाने खेळली गेली. या स्पर्धेकरीता जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ तसेच सेंटुरी रॅयन हायस्कूलचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.