CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

आरएसपी अधिकाऱ्यांचे कार्य पोलीस विभागासाठी कौतुकास्पद व.पो.नि.एस.एस. सांडभोर यांचे प्रतिपादन

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

आरएसपी अधिकाऱ्यांचे कार्य पोलीस विभागासाठी कौतुकास्पद व.पो.नि.एस.एस. सांडभोर यांचे प्रतिपादन

डोंबिवली (क्राईम बॉर्डर टीम)

आर.एस.पी. अधिकारी शिक्षक युनिट केल्या वर्षभरापासून महाराष्ट्र राज्य आर.एस.पी. चे प्रवीण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व कमांडर मणिलाल शिंपी यांच्या नेतृत्वाखाली महापालिका प्रशासन आणि पोलीस विभागाला कोणत्याही प्रकारच्या मोबदला न घेता प्रामाणिकपणे कर्तव्य करीत आहेत.

 

आर.एस.पी. अधिकारी युनिट चे कार्य शिक्षण विभागासाठी अभिमानाची बाब आहे. अशा आर.एस.पी. अधिकारी शिक्षक योद्ध्यांना पोलीस विभागातर्फे मानाचा मुजरा या शब्दात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांडभोर यांनी कौतुक केले.

 

कल्याण विभागाचे अप्पर आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या आदेशानुसार, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या लेखी आदेशाप्रमाणे खडकपाडा, वाहतूक उपशाखा कल्याण पश्चिम, महात्मा फुले, मानपाडा पोलीस स्टेशन, रामनगर पोलीस स्टेशन, विष्णुनगर पोलीस स्टेशन डोंबिवली अंतर्गत आर.एस.पी. शिक्षक आपत्कालीन परिस्थितीत विशेष पोलीस अधिकारी म्हणून बंदोबस्त आणि नागरिकांना कोरोना विषयी समुपदेश करीत आहेत.

 

एसीपी. उमेश माने पाटील (वाहतूक), एसीपी . अनिल पोवार , डोंबिवली चे एसीपी मोरे ,कल्याण वाहतूक वपोनि. सुखदेव पाटील , खडकपाडा पोलीस स्टेशनचे वपोनि. अशोक पवार , महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वपोनि. नारायण बानकर , जाधव ,शेलार मॅडम, रामनगर पोलीस स्टेशनचे वपोनि. सचिन सांडभोर ,तडवी, मानपाडा वपोनि. दादा हरी चौरे, पो. नि . बाळासाहेब पवार , या सर्वांकडून आर.एस.पी. युनिटला मोलाचे मार्गदर्शन व बहुमूल्य प्रशिक्षण रुपी सूचना तसेच सहकार्य मिळत आहे.

 

यांना स्वामीनारायण ट्रस्ट, जेसुस इज लाईफ ट्रस्ट, प्रभाकर बाविस्कर, नेटवर वर्मा ,मुकेश टेलर, अभिषेक वर्मा, सुधीर दिनकर, अमृतविला ट्रस्ट, सिंधू एज्युकेशन सोसायटी च्या सेक्रेटरी प्राचार्या श्रीमती रेखा ठाकूर यांच्या वान्या फाउंडेशन, या सर्व दानशूर संस्था आणि संस्थापक यांच्या सहकार्याने कोरोना सारख्या आपत्तीत बेरोजगार झालेले, गरजू, भिकारी, उपासमार होत असलेल्या लोकांना दुपारचे आणि रात्रीचे जेवण वाटप आर .एस. पी च्या माध्यमातून करण्यात येत आहे.

 

आर.एस.पी. अधिकारी युनिट चे कार्य शिक्षण विभागासाठी अभिमानाची बाब आहे. अशा आर.एस.पी. अधिकारी शिक्षक योद्ध्यांना पोलीस विभागातर्फे मानाचा मुजरा या शब्दात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांडभोर यांनी कौतुक केले. कोरोना च्या दुसऱ्या आणि महाभयंकर लाटेतही आर.एस.पी. अधिकारी युनिट कमांडर मणिलाल शिंपी यांच्यासह जितेंद्र सोनवणे, बाळासाहेब भोसले, बन्सीलाल महाजन, छोटू अहिरे, सुभाष वानखेडे, संजय फिरके, संतोष गोरडे, वसंत गावित, दत्तात्रय सोनवणे, विजय भामरे, वसंत गावित, कुर्ला विभागाच्या समादेशक श्रीमती रेखा प्रभू, भानुदास शिंदे, आणि महादेव क्षिरसागर, अनंत किनगे, बापू शिंपी, कैलास पाटील, भगवान परदेशी, नितीन पाटील, शरद बोरसे, रितेश पाटील, गजानन पाटील हे वाहतूक विभागाला सहकार्य करीत आहेत.*