CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डोंबिवली भूषण पुरस्कार प्राप्त अरुण हेडाउ यांचे निधन

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

डोंबिवली भूषण पुरस्कार प्राप्त अरुण हेडाउ यांचे निधन

डोंबिवली(क्राईम बॉर्डर-राजेंद्र वखरे):जगी सर्व सुखी असा कोण आहे ? विचारी मना तुच शोधूनी पाहे.गेल्या २०२० पासून आपल्या भारत देशामध्ये कोरोना महामारी ने हाहा:कार माजवला आहे.आपण सर्वजण पहिल्या लाटेतून सही-सलामत जगलो वाचलो,काहींनी कोरोना वर मात केली,तर काहींनी खूपच खबरदारी घेतली.पहिली लाट संपते न संपते तोच जानेवारी २०२१ पासून दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे.माणूस माणसाला घाबरू लागला आहे.तो एकमेकाच्या जवळ जात नाही की,हात मिळत नाही,आलिंगन देत नाही.प्रत्येकाला जीवाच्या भीतीने ग्रासले आहे.आणि ती काळाची गरजही आहे.(सामाजिक अंतर गरजेचेही आहेच.)

 

या लाटेमध्ये अनेक नामवंत,किर्तीवंत गरीब-श्रीमंत असे दुर्दैवाने सापडले काही बरे झाले, तर काहींनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.या रोगाने माणसाची काय औकात आहे? हे प्रखरतेने प्रत्येकाला समजले पण तरीही अजूनही काही हेकडी आहेतच.त्यांना या जगाशी माणसाशी काही देणे घेणे नाही.कारण त्यांनी कोरोना हा अनुभवलेलाच नाही.पण अशी वेळ ही कुण्या दुष्मनावर ही येऊ नये.पण.....भूतकाळात व वर्तमान काळातही असे काही सामाजिक कार्यकर्ते जिवंत आहे की,ते आपल्या छातीवर दगड ठेवून गरजवंतासाठी धावून जातांना दिसतात.जो-तो आपापल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे.पण सर्वांना कोरोनाची भीती वाटते हे तेवढेच खरे आहे.

 

एवढं सांगायचं कारण म्हणजे...आपल्या डोंबिवली शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तथा डोंबिवली भूषण पुरस्कार प्राप्त श्री.अरुण हेडाउ(काका)यांचे कोरोनामुळे आज दि.२ मे रोजी दुःखद निधन झाल्याचे समजले.ही बातमी समजताच अंगावर शहारा आला.अनामिक भीती वाटली अरुण हेडाउ(काका)म्हणजे डोंबिवलीकर मी त्यांना गेल्या ११ वर्षापासून ओळखतो.

 

अतिशय नम्र,सहनशील,अभ्यासू,एकाच भेटीत आपलंसं करून घेणारं,प्रत्येकाला मान-सन्मान देणारं व्यक्तिमत्व डोंबिवली शहर व परिसरातील सामाजिक संस्थांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणे,त्यांच्याबद्दल भरभरून बोलणे.तसेच ठाणे पोलीस आयुक्तालयातील मोठमोठे अधिकाऱी ते पो.शिपाई पर्यंत त्यांचे आपुलकीचे व प्रेमाचे मैत्रीपूर्ण संबंध होते.तसेच त्यांचे प्रत्येक पक्षाच्या लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने ते सर्वांना हवेहवेसे वाटत असत.त्यांना जे-जे ओळखत होते ते आग्रहाने व आठवणीने अरुण हेडाउ(काका)यांना कार्यक्रमासाठी आदराने बोलावत असत एवढेच नव्हे तर विष्णुनगर पोलीस ठाण्यातील १५ ऑगस्ट असो किंवा २६ जानेवारी असो ते हजर असत.

 

बरं हे व्यक्तिमत्व म्हणजे निस्वार्थ प्रेम करणारं व्यक्तिमत्व ते माझ्याशी दिनांक १४ एप्रिल २०२१ रोजी फोनवरून बोलले. निमित्त होतं आमच्या २१ व्या लग्नाच्या वाढदिवसाचं.आठवणीने ते मुलांचा वाढदिवस असो किंवा आमच्या लग्नाचा वाढदिवस असो ते मलाच काय पण अनेकांना फोन करून शुभेच्छा देत असत.गेल्या काही वर्षांमध्ये त्यांची तब्येत त्यांना साथ देत नव्हती पण तरीही ते विविध ठिकाणी जात असतं.मला त्यांचे दि.१४ एप्रिल २०२१ चे शब्द आजही आठवतात की,राजेंद्र तुम्हाला माझी काही गरज असली तर नक्की हक्काने सांगा तुमच्या एनजीओ साठी मी प्रयत्न करेल.आम्हाला त्यांचा अभिमान खूप वाटतो.त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा होता.

 

अशा या हरहुन्नरी मनाने तरुण असलेल्या आदरणीय अरुण काका हेडाउ यांचं आपल्या सर्वांना सोडून जाणं हे मनाला पटत नाही अजून त्यांची त्यांच्या कुटुंबीयांना व डोंबिवलीकरांना गरज होती ते तरुणांसाठी झटत असतच परंतु ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असत.त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये अनेक लोक जोडलेली होती.त्यांची ही त्यांची ही बातमी मनाला चटका लावून जाणारी आहे. अरुण हेडाउ(काका)यांना विसरणं शक्य नाही.अशा या थोर व्यक्तिमत्वास क्राईम बॉर्डर व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन(संस्था),पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट,साप्ताहिक कल्याण-डोंबिवली व्हिजन,डोंबिवली परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली