CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
ठाणे, दि. 26 : - ठाणे जिल्ह्यात 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत सैन्य भरती होणार आहे.भारतीय सैन्यामध्ये होणारी भरती प्रक्रिया पूर्णत: पारदर्शक असून सैन्य दलात भरतीसाठी पैसे अथवा इतर वस्तूंची मागणी करणाऱ्यांविरुद्ध पोलीसात तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजल जाधव यांनी केले आहे.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सैन्य दलातील भरती प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक आहे आणि यामध्ये कुठल्याही स्तरावर पैशांची देवाण घेवाण होत नाही. भारतीय सैन्यामध्ये भरती होण्यासाठी कुठल्याही दलालांची आवश्यकता नाही. दलाल किंवा कुठलीही मध्यस्थ व्यक्ती सैन्यामध्ये भरती करू शकत नाही. जर कुणी ही व्यक्ती किंवा दलाल सैन्यात भरती करण्यासाठी पैसे किंवा इतर वस्तूंची मागणी करत असेल तर आपल्या नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करा. यांच्याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी (दुरध्वनी क्र :- 022-25343174) संपर्क साधावे, असे आवाहन असे ठाण्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. जाधव यांनी केले आहे. आहे.