CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
पुणे (क्राईम बॉर्डर, रिपोर्टर) : पुणे जिल्ह्यातील रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. ७ ऑगस्ट ते २० सप्टेंबर २०२० पर्यंत कॉन्ट्रॅक्टर श्री साई इंटरप्राईजेस या ठेकेदाराकडे जळगाव जिल्ह्यातील काही मजूर हे काम करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी यांनी वरील कालावधीत काम केले व ओटी सुद्धा केली, परंतु त्यांना या ठेकेदाराने त्यांच्या मेहनतीचे पैसे न दिल्याने ते आपापल्या घरी परत आले.
त्यांनी व्हील्स इंडिया लिमिटेड रांजणगाव या कंपनी मधील कॉन्ट्रॅक्टर श्री साई इंटरप्राईजेस चे मालक यांच्याकडे पगाराची मागणी केली असता त्यांनी सांगितले की कॉन्ट्रॅक्टर रिशिकेश चिखले हे सर्व काम बघतात तेव्हा तुम्ही त्यांना पगार मागा त्यांच्याकडे पगार मागितला असता ते म्हणाले की शुभम भुजबळ यांच्याकडे मी पगार दिलेला आहे. तुम्ही त्यांना मागणी करा सदर मजुरांनी शुभम भुजबळ यांच्याकडे पगाराची मागणी केली असता त्यांनी या मजुरांना सांगितले की तुमचा काहीएक संबंध नाही. मी तुम्हाला पगार देणार नाही तुम्हाला जे काय करायचे ते करून घ्या .अशा या मागणीमुळे हे मजूर हतबल झाले व आपापल्या गावी निघून आले त्यावेळेस कोवीड १९ असल्यामुळे सर्वांचीच परिस्थिती गंभीर झाली होती.
सतत पगाराची मागणी करूनही कंपनी व त्यांचे कॉन्ट्रॅक्ट बघणारे हे पगार देत नसल्याचे पाहून त्यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून न्याय मागितला असता पोलीस अधीक्षक यांनी आर्थिक गुन्हे सर्व प्रकारच्या आर्थिक फसवणूक व अफरातफरी या गुन्ह्यात नोंद घेऊन ताबडतोब सदर तक्रार रांजणगाव पोलीस स्टेशनला वर्ग केली. रांजणगाव पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी तात्काळ या प्रकरणावर गोपनीय अंमलदार पो.कॉ .विनोद काळे यांना कारवाई करून सदर तरुणांना न्याय देण्यास सांगितले काळे यांनी तातडीने त्या कॉन्ट्रॅक्टरदारा ला बोलावून घेतले व सर्व हकीकत समजून घेऊन आपल्याकडे काम करीत असलेल्या कामगारांचे पैसे बुडवणे हे योग्य नाही अशा प्रकारे त्यांना सामाजिक बांधिलकी समजावून सांगितली असता सदर मजुरांचे पैसे देण्यास त्यांना सांगितले.
संबंधितांनी ताबडतोब पोलीस निरीक्षक राऊत व विनोद काळे यांचे म्हणणे ऐकून ताबडतोब सदर मजुरांचे पैसे त्यांना दिले.विशेष म्हणजे या मजुरांना जळगाव जिल्ह्यातून रांजणगावला न येता त्यांचा भाड्यातोड्याचा खर्च व वेळ वाचावा यासाठी सदर कंपनीला गुगल पे करण्यास सांगितले.पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (भा.पो.से) , पोलीस उपअधीक्षक (आर्थिक गुन्हे शाखा) राजेंद्र कदम , उपविभागीय पोलीस अधिकारी ,दौंड विभाग राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली व रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या नेतृत्वाखाली पो.कॉ.विनोद काळे यांनी काम पाहिले.न्याय मिळालेल्या मजुरांनी पोलीस अधीक्षक व उपाधीक्षक डीवायएसपी तसेच रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत व पो. कॉ. विनोद काळे यांचे आभार व्यक्त केले.सदर प्रकरणी क्राईम बॉर्डर चे संपादक व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन या एनजीओ संस्थापक राजेंद्र वखरे यांनी पो.नि.सुरेशकुमार राऊत यांच्याकडे पाठ पुरावा केला होता.