CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

Ramadan timetable 2022 रमजान देखो चाँद आया!चाँद आया!यावर्षातील रमजानमधील सेहरी आणि इफ्तारची भारतातील वेळ

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

Ramadan timetable 2022 रमजान देखो चाँद आया!चाँद आया!यावर्षातील रमजानमधील सेहरी आणि इफ्तारची भारतातील वेळ

CRIME BORDER NEWS NETWORK

मुंबई : Ramadan 2022 रमझानचा पवित्र महिना आहे.जगभरातील मुस्लिम वार्षिक ३० दिवसांचा उपवास करतात.भारतात सेहरी आणि इफ्तारची तारीख आणि वेळ याबद्दल बघू या.मुंबई : रमजान (Ramadan) ज्याला रमजान किंवा रमझान किंवा रमझान देखील म्हटले जाते, हा मुस्लिम चंद्र कॅलेंडरमधील ९ वा महिना आहे आणि इस्लामिक (Islamic)संस्कृतीनुसार हा महिना सर्वात पवित्र महिना मानला जातो जो बहुदा २९/३० दिवसांच्या उपवासांमध्ये असतो आणि मोठ्या उत्सवाने आणि मेजवानीसह समाप्त होत असतो.या दिवसाला ईद-उल-फित्र म्हणूनही ओळखले जाते. या वेळेत देवाने पवित्र कुराणचे १ ला श्लोक लिहला असा विश्वास आहे. मुस्लिम बंधू-भगिनी पहाटेपासून संध्याकाळपर्यंत खाणेपिणे टाळतात आणि पारंपारिक पद्धतीने संध्याकाळी इफ्तारच्या (Iftari) वेळी खजूर किंवा फळे घेऊन उपवास सोडतात.पूर्ण दिवस उपवास धरून ५ वेळेची नमाज पडतात आणि पूर्ण दिवस अल्लाची इबादत करून उपवास ठेवतात.रमजानमध्ये उपवास सुरू करण्यापूर्वी जे जेवण केले जाते त्याला सेहरी किंवा सुहूर म्हणतात आणि संध्याकाळच्या प्रार्थनेची अजान झाल्यावर उपवास मोडला जाणारा आहार म्हणजे इफ्तार.

 

भारत देशात रमजानची तारीख:
या वर्षी, भारतामध्ये २ एप्रिल पासून रमजान सुरू झाला आहे.पहिला उपवास ३ एप्रिल २०२२ रोजी पाळला जाईल. सहसा, सौदी अरेबिया आणि काही पाश्चात्य देशांसह भारताच्या काही भागांमध्ये रमजानची चंद्रकोर दिसली की त्यानंतर सामान्यतः एक दिवसानंतर उर्वरित भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि इतर देशांमध्ये इफ्तारी साजरी होईल.भारतातील शहरांनुसार ‘सेहरी’ आणि ‘इफ्तार’च्या वेळा :

हैदराबाद 05:01am, 06:30pm

दिल्ली 04:56am, 06:38pm

अहमदाबाद 05:20am, 06:55pm

सुरत 05:21am, 06:53pm

मुंबई 05:22am, 06:52pm

पुणे 05:19am, 06:48pm

बेंगळुरू 05:07am, 06:32pm

चेन्नई 04:56am, 06:21pm

कलकत्ता 04:17am, 05:51pm

कानपूर 04:46am, 06:25pm

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की सेहरी किंवा सुहूर आणि इफ्तारचे वेळापत्रक सूर्याच्या स्थितीमुळे बदलू शकते.