CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

नाभिक समाज संघटना डोंबिवली च्या वतीने जावेद हबीब च्या वक्तव्याचा जाहीर निषेध

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

नाभिक समाज संघटना डोंबिवली च्या वतीने जावेद हबीब च्या वक्तव्याचा जाहीर निषेध

क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क

डोंबिवली : मुजफ्फरनगर येथील एका सेमिनारमध्ये जावेद हबीबने एक गैरवर्तन आणि गैर कृती केली होती.ज्यामुळे लोकांमध्ये नाभिक समाजाविषयी संभ्रम निर्माण होण्याची शक्यता होती. वेळीच अशा अपप्रवृत्तींना आळा बसावा आणि लोकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या नाभिक बांधवां विषयी गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून नाभिक समाज संघटना डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांनी दि. ८ जानेवारी २०२१ रोजी जावेद हबीबचा निषेध व्यक्त केला आणि त्याने केलेल्या गैर कृतीबद्दल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी अशा प्रकारची मागणी केली आहे.

या निषेध कार्यक्रमासाठी काटेकोरपणे सोशल डिस्टंसिंग पाळण्यात आले होते. नाभिक समाज संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष बाबासाहेब राऊत ,सचिव मंगेश पोफळे (सर), खजिनदार बाळा पवार, ,सल्लागार राजेंद्र वखरे,तुषार शिंदे, दशरथ चित्ते, संतोष शर्मा, सोमनाथ वरपे, भरत धायरे आणि सर्व नाभिक बांधवांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

 

नाभिक समाज हा ग्राहकांना दैवतासमान मानतो. ग्राहकांची सेवा करणे हे कर्तव्य मानतो. नाभिक समाज पारंपारिक पद्धतीने व्यवसाय करत आहे. आणि त्यामुळे ग्राहकांच्या प्रति नेहमीच त्यांना आदर आहे.

 

त्यांच्याशी आम्ही कोणतेही गैरकृत्य करणार नाही अशी अपप्रवृत्ती समाजामधून समाजामध्ये कोणी पसरवत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो असे प्रतिपादन यावेळी सचिव मंगेश पोफळे (सर) यांनी व्यक्त केले. अध्यक्ष बाबासाहेब राऊत यांनी सांगितले की ,प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कोणीही काही व्यक्तव्य करून नाभिक समाजाविषयी अनादर निर्माण केला जात असेल तर समाज हे सहन करणार नाही. त्यांना वेळीच अद्दल घडवली जाईल. नाभिक समाज संघटना डोंबिवलीच्या वतीने आज सर्व शहरांमध्ये शहरातील सर्व नाभिक बांधवांना काळ्या फिती लावून काम करण्याची विनंती करण्यात आली होती त्याप्रमाणे डोंबिवलीतील सर्व नाभिक बांधवांनी दंडाला कळ्या फिती लावून काम केले आणि शांततेने निषेध व्यक्त केला.