CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

अत्यावश्यक सेवांमध्ये चिकण मटण अंडी व मासे दुकानांचा अंतर्भाव

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

अत्यावश्यक सेवांमध्ये चिकण मटण अंडी व मासे दुकानांचा अंतर्भाव
  • ठाणे दि.9 :- महाराष्ट्र शासनाने कोविड-19 रोगाचा प्रादुर्भाव खंडीत करण्यासाठी (ब्रेक द चेन) अभियानातर्गंत दिलेल्या आदेशामध्ये आणखी काही बाबीचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. यात पशुसंवर्धन विभागाशी निगडीत खालील बाबी अंर्तभूत आहेत.
  • 1. अत्यावश्यक सेवामध्ये दुध व दुग्धजन्य पदार्थ (डेअरी) आणि फुडशॉपचा समावेश करण्यात आला आहे. यात चिकन, कोंबडया, मटण, अंडी, मासे दुकानाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. जनावरांसाठी आवश्यक असणारे पशु/कुकुट खाद्य, चारा आदिचाही समावेश केला आहे.
  • 2. हवामान व मान्सून पुर्व उपक्रमाच्या व्यवस्थापनेच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागामार्फत दरवर्षी व्यापक प्रमाणात जनावरांचे मान्सून पुर्व लसीकरण केले जाते. या उपक्रमाला अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करण्यात आले आहे.
  • 3. जनसामान्यांना पुरविण्यात येणाऱ्या सेवामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयाचा समावेश केला आहे.
  • 4.माल वाहतूक सेवेमध्ये वाहतूक व पुरवठा शृंखला सुरु ठेवण्यात आली असून यात दुध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, मासे व जनावरांचा चारा या वस्तु व त्यांचेवर प्रक्रीया करण्यासाठी लागणाऱ्या कच्या मालाची वाहतूक व त्यांच्या साठवणुकीसाठी गोदामे चालविणे याबाबींचा अत्यावश्यक सेवेत अंतर्भाव होतो.
  • 5. सर्व प्रकारचे उत्पादन उद्योग सुरु ठेवण्यात आले आहे. यात अन्न प्रक्रीया , डेअरी, पशुखाद्य व चारा प्रक्रीया, औषध निर्मिती, लस निर्मिंती, वैद्यकीय उपकरणे निर्मिंती तसेच या सर्वांना सहाय्यभूत ठरतील अशा सेवा, त्यांची वाहतूक आणि त्यांचे विक्रेते व त्यांच्या सेवा समाविष्ठ केल्या आहेत.
  • या सेवा उपलब्ध करीत असताना संबंधितानी शासनाद्वारे तसेच स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या निर्देशाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.