CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
CRIME BORDER NEWS NETWORK
नवी मुंबई, दि २२ : नाशिक येथे 18 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या "महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार 2022" मध्ये नवी मुंबईतील डॉ. शिरीन इनामदार यांना "एक्सलन्स इन हेल्थ अँड वेलनेस" या श्रेणीतील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. शिरीन इनामदार गेली 18 वर्ष स्थौल्य चिकित्सक म्हणुन कार्यरत आहेत. आयुर्वेद, आहार व योग यांच्या सहाय्याने त्यांनी आजपर्यंत बर्याच लोकांना निरोगी राहण्यास मदत केली आहे. यापूर्वीही त्यांना "द रियल सुपर वुमन 2020 " व "भारत गौरव पुरस्कार 2021 " प्रदान झाले आहे.
या सर्व सन्मानाने माझे समाजासाठी कार्य करण्याची इच्छा द्विगुणित झाला आहे, असे मनोगत डॉ. शिरीन इनामदार यांनी व्यक्त केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रसारण न्युज 18 लोकमत चॅनेलवर दिनांक 26 व 27 फेब्रुवारीला दुपारी 2.30 वाजता होणार आहे.
मुख्य संपादक : राजेंद्र वखरे, संपर्क 9619630035