CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

आश्रय महिला संस्था व अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने -महिलांसाठी जनजागृती कार्यक्रम संपन्न

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

आश्रय महिला संस्था व अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने -महिलांसाठी जनजागृती कार्यक्रम संपन्न

क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क :

अंबरनाथ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मंगरूळ याठिकाणी महिलांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेविका सुमतीताई पाटील उर्फ माई तसेच अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक सुप्रिया देशमुख या होत्या तर स्वागताध्यक्षपदी आश्रय महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ सीमा वखरे व अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे एपीआय जयेंद्र भोईर हे होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ.दृष्टी गुप्ता व सौ माधुरी भोयर उपस्थित होत्या.

 

महिलांसाठी मास्क ,साड्या , सॅनिटरी पॅड ,लहान व मोठ्या मुलांसाठी कपडे वाटप करुन खाऊ व स्नॅक्स वाटप करण्यात आला-शिक्षण काळाची गरज व पोलीस सदैव तुमच्यासाठी,अन्याय सहन करू नका शिका व कुटुंबाचे नाव मोठे करून समाजासाठी काहीतरी कार्य करा त्याबाबत परिसंवाद तसेच व्यसनमुक्ती यावर सपोनि. सुप्रिया देशमुख यांनी महिलांना मार्गदर्शन केले.लहान मुली व मुलांना त्यांनी गूड टच बड टच याचे प्रात्यक्षिक करून दाखविले‌.

 

डॉ.दृष्टी गुप्ता (कळवा हॉस्पिटल) यांनी महिला व मुलींना मासिक धर्माबाबत व गरोदर माता यांनी काय काळजी घ्यावी तसेच महिलांनी आपल्या आरोग्याबाबत कोणत्या प्रकारे सजग रहावे यावर संवाद साधला. तर अलीकडच्या काळात १०/१२ वर्षं वयोगटातील मुलींना मासिक पाळी येत असून त्यांच्याशी घरातील त्याबाबत मनमोकळेपणाने बोलले पाहिजे असे सांगितले. त्याच बरोबर व्याख्यान देऊन परीसंवाद साधला.

 

तर ज्येष्ठ समाजसेविका सुमतीताई पाटील (माई) यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की गरिबी असली तरी लाजू नये व श्रीमंती आली तर माजू नये मुलींनी खंबीर राहायला पाहिजे शिक्षण घेतले पाहिजे तरच आपल्या कुटुंबाची स्वतःची व देशाची प्रगती होते त्याचबरोबर त्या म्हणाल्या की मुलींनी जागरूक राहायला पाहिजे अनोळखी व्यक्तीशी बोलू नये जर कोणी आपला पाठलाग करत असेल तर मदतीसाठी कुणाला आवाज द्यावा व घरी आपल्या आई-वडिलांना सांगावे. महिला व तरुणींच्या बाबतीत असे घडले तर त्यांनी अशा गोष्टीचा प्रतिकार करत पोलिसाची संपर्क साधावा मीसुद्धा लहानपणापासून अनेक वाईट गोष्टीचा सामना केला आहे परंतु मी शिक्षण घेऊन आत्ता इतरांना मदत करते.

 

सपोनि.जयेंद्र भोयर यांनी सर्वप्रथम पोलीस रेझिंग डे का साजरा करण्यात येतो त्याबाबत माहिती देऊन पोलीस दलाची कार्यपद्धती समजावून सांगितली .ते म्हणाले की तत्कालीन महासंचालक संजीव दयाळ यांच्या पुढाकारातून *स्थापना दिन*; साजरा करण्यात येत आहे.त्यानंतर ते म्हणाले की आश्रय महिला संस्था महिलांसाठी कार्य करते हि संस्थेने , पोलीसांना सोबत घेऊन यापुढेही आदिवासी बहुल भागात महिला व मुलींसाठी यापुढेही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करावे व जनजागृती करावी. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाला पोलीस सदैव त्यांच्या मदतीला असतील.

 

आश्रय महिला संस्थेचे ट्रस्टी तथा क्राईम बॉर्डर चे संपादक राजेंद्र वखरे यांनी प्रस्तावना मांडताना सांगितले की आश्रय महिला संस्थाही सदैव अनाथ मुले व महिलांसाठी तसेच त्यांच्या उन्नतीसाठी कार्य करणार आहे. येत्या काही काळात अनाथ मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृह निर्माण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रुप ग्रामपंचायत मंगरूळ चे पोलीस पाटील बाळाराम उघडे व येथील ग्रामस्थांनी सहकार्य केले.

 

यावेळी एपीआय जयेंद्र भोईर, सुप्रिया देशमुख ,ज्येष्ठ समाजसेविका सुमतीताई उर्फ (माई), संस्थेच्या अध्यक्षा सौ सीमा वखरे,डॉ.दृष्टी गुप्ता ,सौ.माधुरी ज.भोयर ,पो.शि. दादा वाघमारे,पो.पा.बाळाराम उघडे ,शिक्षिका वैदेही देशमुख, पत्रकार संतोष कोलंबकर, सोनाली झोडगे छायाचित्रकार हर्षद राजगुरू, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षिका वैदेही देशमुख यांनी केले.आभार एपीआय हे सुप्रिया देशमुख व राजेंद्र वखरे यांनी मानले.