CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

मनुष्य बळाची माहिती भरण्यासाठी कंपन्यांना 31 मे पर्यंत मुदत

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

मनुष्य बळाची माहिती भरण्यासाठी कंपन्यांना 31 मे पर्यंत मुदत

ठाणे : ठाणे जिल्हयातील सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील सर्व संस्था व कंपन्यांनी मनुष्यबळाची माहिती (ER-I) राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी 31 मे 2021 पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे.

 

सेवायोजन कार्यालये कायदा 1959 अन्वये रिक्त सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय , निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील कायदयाअंतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पूरूष / स्त्री अशी एकूण सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहिस कायदयाच्या तरतूदीनुसार भरणे बंधनकारक आहे. मार्च 2021 अखेर संपणाऱ्या तिमाहीची माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जुने कोषागार कार्यालय , जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे कार्यालयात चालू आहे.

 

या संदर्भात कोणत्याही स्वरूपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास thanerojgar@gmail.com ई-मेल आयडीवर उद्योजक नोंदणी क्रमांक व इतर सर्व आवश्यक तपशीलासह संपर्क साधल्यास कार्यालयाकडून सहकार्य करण्यात येणार आहे.

 

सर्व आस्थापनांकडून 100 टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. सर्व आस्थापनांना यापूर्वीच यूजर नेम व पासवर्ड देण्यात आलेले आहेत. त्यांचा वापर करून प्रत्येकाने या विभागाच्या संकेत स्थळावर लॉगिन करावे व कायदयाचे अनुपालन करावे. असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे कार्यालयाच्या सहायक आयुक्त कविता ह. जावळे कळविले आहे.