CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

सांस्कृतिक कार्य विभागाच्या अनुदानासाठी जिल्ह्यातील कलाकारांनी अर्ज कराव- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आवाहन

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

सांस्कृतिक कार्य विभागाच्या अनुदानासाठी जिल्ह्यातील कलाकारांनी अर्ज कराव- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आवाहन

ठाणे दि. 18/01/2022 : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कलाकारांना राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने एकरकमी पाच हजार आर्थिक सहाय्य मिळणार आहे. ठाणे जिल्ह्यातील दोन हजार कलाकारांना या अर्थसहाय्याचा लाभ देण्यात येणार असून यासाठी कलाकारांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे

 

कलाकारांनी हे अर्ज नजिकच्या तहसीलदार कार्यालयात सादर करायचे आहेत. यासाठी लागणारा अर्जाचा नमुना सर्व तहसीलदार कार्यालय तसेच http://www.mahasanskruti.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. एकरकमी आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी शासनाने ठरविलेल्या पात्रता अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. एकल कलाकार सहाय्यासाठी कलेच्या क्षेत्रात 15 वर्ष कार्यरत असल्याबाबतचे पुरावे, महाराष्ट्रात 15 वर्ष वास्तव, वार्षिक उत्पन्न 48 हजारांच्या कमाल मर्यादेत असणे आवश्यक आहे.कलाकारांनी अर्ज सादर केल्यानंतर त्या अर्जावर छाननी समिती अर्जांची पडताळणी करेल त्यानंतर पात्र कलाकारच्या निवड याद्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांस्कृतिक कार्य संचालनाकडे अर्थ सहाय्यासाठी सादर करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांनी दिली.

 

केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वृद्ध कलाकार मानधन योजनेतून मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना तसेच इतर वैयक्तिक शासकीय अर्थसहाय्यच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.