CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
डोंबिवली (रामेश्वर काळे) : डोंबिवली स्टेशन पाटकर रोड कामत मेडिकल समोर लादी नाका डोंबिवली (पुर्व) , या ठिकाणी महाराष्ट्र जनरल मजदूर संघटने च्या वतीने नुकताच गोपाळ काला व दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी साठी अतिथी डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे ,उद्योगपती रवि शेट्टी ,गजानन व्यापारी , सौ. सुलेखा गटकळ ,संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ अंकुर सामाजिक संस्थाच्या सौ.अक्षता भोसले उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डोंबिवली शहर युवा अध्यक्ष नामदेव भानुसे,खजिनदार विश्वनाथ रेवगडे ,सह खजिनदार काकासाहेब मिसाळ ,डोंबिवली शहर नाका अध्यक्ष रामेश्वर शेजुळ ,केशव मिसाळ ,योगेश ठोंबरे, कल्याण तालुका युवा अध्यक्ष सौ मनिषाताई सुर्वे, पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले .
दहिहंडीला सलामी देण्यासाठी एकुण २१ गोविंदा पथकांनी उपस्थित दर्शविली सर्व गोविंदा पथकाचे पुष्प गुच्छ शाल श्रीफळ यथोचित सन्मान करण्यात आला. तर यावेळी एस. एल .बाॅय गोविंदा पथकांने दहिहंडी फोडण्याचा मन मिळविला . यावेळी नाका कामगार व डोंबिवलीतील नागरीकमोठ्या संख्येने उपस्थित होते.