CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

ठाणे सैनिकी मुलांच्या वसतिगृहातील प्रवेशासाठी 22 जुलै पर्यंत अर्ज करावा

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

ठाणे सैनिकी मुलांच्या वसतिगृहातील प्रवेशासाठी 22 जुलै पर्यंत अर्ज करावा

ठाणे :- ठाणेमधील नौपाडा (पश्चिम) येथील सैनिकी मुलांच्या वसतीगृहामध्ये माजी सैनिक, सेवारत सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांच्या शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात येते. या वसतीगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी 22 जुलैपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजल जाधव यांनी केले आहे.

नौपाडा येथील धरमवीर नगर, ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या मागे सैनिकी मुलांचे वसतीगृह आहे. या वसतीगृहामध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी विविध महाविद्यालयात इयत्ता अकरावी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या तसेच औद्योगिक प्रशिक्षण आणि तांत्रिक विद्यालयामध्ये शिकत असलेल्या माजी सैनिकांच्या मुलांकरीता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून परिपूर्ण अर्ज दि.22 जुलै 2022 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज जमा केले आहेत, त्यांनी पालकांसह दि.29 जुलै 2022 रोजी प्रवेश प्रक्रियेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.

या वसतीगृहात सेवारत सैनिक अधिकाऱ्यांच्या मुलांकरीता भोजन, निवास व सेवा करासह एक हजार रु., जेसीओच्या मुलांकरीता रू.900, शिपाई व एनसीओच्या मुलांकरीता रू.700, माजी सैनिक अधिकारी व ऑन कमिशन्ड अधिकाऱ्याच्या मुलांकरीता रू.900, जेसीओच्या मुलांकरीता रू.800, शिपाई व एनसीओच्या मुलांकरीता रू.600 व इतर नागरिकांच्या मुलांकरीता रू.2250 इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. युद्ध विधवा व इतर माजी सैनिकांच्या विधवांच्या पाल्यांना तसेच माजी सैनिक अनाथ पाल्यांना भोजन, निवास व सेवाशुल्क मोफत आहे. सैनिकांच्या पाल्यांना प्रवेश दिल्यानंतर रिक्त जागेवर इतर नागरिकांच्या पाल्यांचा तिसऱ्या किंवा अंतिम फेरीत विचार करण्यात येईल.

अधिक माहितीसाठी सैनिकी मुलांचे वसतिगृह, ज्ञानसाधना कॉलेजमागे, धरवीर नगर, नौपाडा, ठाणे पश्चिम या ठिकाणी तसेच मो. क्र. 9769664830 या क्रमांकावर संपर्क करण्यात यावे, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.