CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
: मुंबई (प्रतिनिधी) :
आकाशवाणी मुंबई अस्मिता चॅनल वरील कामगार सभा या कार्यक्रमांमध्ये खान्देशचे सुपुत्र व बेटावद बुद्रुक ,ता. जामनेर ,जि.जळगाव येथील मूळ निवासी हल्ली डोंबिवली येथे स्थायिक असलेले समाजसेवक तथा पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट व क्राईम बॉर्डर, क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) चे संस्थापक राजेंद्र वखरे यांची हर्षदा प्रभू यांनी घेतलेली मुलाखत दि. ११ डिसेंबर २०२० रोजी वेळ रात्री ९.३० वाजता कामगार सभा या कार्यक्रमांमध्ये प्रसारित होणार आहे. U can listen it on newsonair app.
तसेच या कार्यक्रमाचे पुन: प्रसारण दि. १२ डिसेंबर २०२० रोजी वेळ सायंकाळी ४.०० वाजता होणार आहे.U can listen it on DTH AIR app
या मुलाखतीमध्ये कामगार व त्यांच्या समस्या तसेच त्यावरील उपाय योजना काय आहेत तसेच राजेंद्र वखरे यांनी त्यांच्या संस्था व स्वयंसेवकांमार्फत कशाप्रकारे सामाजिक उपक्रम राबविले आहेत व राबवणार आहेत, तसेच कामगार व त्यांच्या कुटुंबा चा स्तर उंचावण्यासाठी साठी सामाजिक व शैक्षणिक विषयावर सखोल चर्चा या मुलाखतीत करण्यात आली आहे.
ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक राजेंद्र वखरे यांच्या सामाजिक कार्याची दखल आकाशवाणी मुंबई केंद्राने घेतली त्याबद्दल त्यांनी आकाशवाणी मुंबई केंद्राचे व टीमचे आभार व्यक्त केले आहे.सर्वांनी ही मुलाखत जरुर ऐकावी असे आवाहन राजेंद्र खरे यांनी केले आहे.
मुलाखत प्रसारण : दि.११ डिसेंबर २०२० रात्री - ९.३० (रेडियो- Newsonair- मोबाइल ऍप-वेबसाइट)
पुनःप्रसारण : दि.१२ डिसेंबर २०२० - वेळ - संध्याकाळी ४.०० वाजता
(DTH- मोबाइल ऍप-वेबसाइट)
कार्यक्रम ऐकण्यासाठी ट्यून करा ....