CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
Central Government Jobs news : भारतात सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान मोदींनी चांगली बातमी दिली आहे. पुढील दीड वर्षांत १० लाख जणांना सरकारी भरती करण्याचे आदेश पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. हे काम मिशन मोडमध्ये करण्यात येणार आहे.
मंगळवारी सकाळी पीएमओ कार्यालयाकडून ट्वीट करण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये ही घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधन स्थितीचा आढावा घेतला आणि सरकारने पुढील दिड वर्षांत मिशन मोडमध्ये १० लाख जणांची भरती करावी, असे निर्देश दिले, असं या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
एप्रिल महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी विविध सरकारी विभागातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला प्रथम प्राधान्य देण्यास सांगितलं होतं. तर, फेब्रुवारीमध्ये राज्यसभेत सादर केलेल्या सरकारी आकड्यांनुसार १ मार्च २०२० पर्यंत केंद्र सरकारमधील विभागात ८७ लाख पदे रिक्त आहेत.