उ प्र मधील महिलापिडितेला न्याय मिळावा व उप्र सरकारच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजनआघाडीची निदर्शने
CRIME BORDER|
26 December 2025
|
07:18 PM
उप्र.मधील महिला पिडितेला न्याय मिळावा व उप्र.सरकारच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची निदर्शने
डोंबिवली ( बापू वैद्य ) उत्तर प्रदेश हाथरस येथील १९ वर्षीय तरुणीवर चार तरुणांनी केलेल्या अमानुष अत्याचार व पाशवी बलात्कारामुळे तिचा दु:खद मृत्यू झाला. या घटनेमुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. देशभरात उत्तर प्रदेश मधील या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे.डोंबिवली पुर्वेकडील इंदिरा चौकात वंचित बहुजन आघाडीने उप्र.मधील महिला पिडितेला न्याय मिळावा व उप्र.सरकारच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी निदर्शने केली.
आयु. माजी डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेंद्र ठोके,आयु. जिल्हा संघटक मिलिंद साळवे, उपाध्यक्ष आयु. राजू काकडे, प्रसिद्धीप्रमुख पँथर सेना ठाणे जिल्हा आयु. दीपक भालेराव,सुरेंद्र छापरवाल, बाजीराव माने,शिवा कांबळे,आशा ठोके, निशा छापरवाल आदींनी निदर्शने केली. निदर्शने करताना वंचित बहुजन आघाडीच्या पदधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उप्र.सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हा संघटक साळवे म्हणाले,ह्या अतिशय गंभीर घटनेनंतर तेथील स्थानिक पोलिसांनी पिडीतेला मदत करण्यास टाळाटाळ केली व त्याविरुद्ध आरडाओरडा होईपर्यंत गुन्हा ही नोंदवून घेतला नव्हता. पिडितेच्या कुटुंबाला विश्वासात न घेता मध्यरात्री अंधारात तिचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचे काम केले. उप्रच्या शासनाची कायदा गुंडाळून ठेवण्याची व गुंडाना पाठीशी घालण्याच्या भूमिकेमुळेच महिलांची सुरक्षितता धोक्यात आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असून या देशात महिला सुरक्षित आहेत का?असा प्रश्न पडतो. उप्र, महाराष्ट्रात व संपूर्ण देशात वारंवार अत्याचाराच्या घटनांमुळे महिलांचा सन्मान आणि सुरक्षितता धोक्यात आहे.