CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
नवी मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव देण्यावर सरकार ठाम असतानाच या विमानतळाला रायगड मधील लोकप्रिय नेते दि. बा .पाटील यांचे नाव देण्याची कृती समितीची मागणी कायम आहे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही आपल्या मागण्या साठी कृती समितीच्यावतीने ते रायगड मध्ये आंदोलन करण्यात येणार आहे नवी मुंबई विमानतळाचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याबाबतचा ठराव सिडकोच्या संचालक मंडळाने-१७-एप्रिल रोजी मंजूर केला आहे त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देत तो केंद्राला पाठवला जाणार आहे.
या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची स्थानिकांची मागणी आहे त्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे सिडकोच्या निर्णयाविरोधात आंदोलनाची घोषणा स्थानिकांनी केल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कृती समितीला चर्चेसाठी पाचारण करण्यात आले होते त्यावेळी विमानतळास ठाकरे यांचेच नाव देण्याचा निर्णय झाला असून दि बा पाटील यांच्याबाबतही सरकारला सादर आहे त्यामुळे त्यांच्या नावा बाबतचा अन्य प्रस्ताव द्यावा सरकार त्याचा नक्की विचार करेल असे सांगत मुख्यमंत्र्यांनी समितीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र विमानतळास दि. बा .पाटील यांचे नाव द्यावे अन्यथा आंदोलन छेडले जाईल अशी भूमिका आमदार प्रशांत ठाकूर व अन्य पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही