CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

सेक्सटॉर्शनचे मुंबईतील मोठे रॅकेटचा पर्दाफाश; बॉलिवूड सेलिब्रिटीज पासून सामान्यांसह १०० जण अडकल्याचा अंदाज

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

सेक्सटॉर्शनचे मुंबईतील मोठे रॅकेटचा पर्दाफाश; बॉलिवूड सेलिब्रिटीज पासून सामान्यांसह १०० जण अडकल्याचा अंदाज

मुंबई(क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क):सेक्सटॉर्शनच्या या टोळीमध्ये दोन आरोपी व्यवसायाने अभियंता आहेत,तर एक अल्पवयीन आरोपी देखील सामील आहे.पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल,१२ बनावट खाती,६ बनावट ई-मेल आयडी आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत.

पोलिसांकडून चार आरोपींना अटक

गुन्हेगारी जगतात तुम्ही खंडणी वसुलीचे प्रकार अनेक वेळा ऐकले असतील.पण यावेळी मुंबई पोलिसांनी एक असे रॅकेट पकडले आहे,ज्याची व्याप्ती अत्यंत मोठी आहे.सामान्य माणसांपासून बॉलिवूडचे जवळपास १०० सेलिब्रिटीज यात अडकले आहेत.मुंबई पोलिसांनी सेक्सटॉर्शन प्रकरणात नागपूर,ओडिशा,गुजरात,कोलकाता येथून चार आरोपींना अटक केली आहे,वेगवेगळ्या राज्यात २५८ जणांची फसवणूक गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई पोलिसांसमोर सेक्स्टॉरशनची प्रकरणे समोर येत होती.कारवाई करताना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने एका टोळीला पकडले आहे,ज्याने वेगवेगळ्या राज्यांतील २५८ जणांना त्याचा बळी बनवले आहे.

पीडितांकडून लाखो रुपये उकळले

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ज्या टोळीचा भांडाफोड केला आहे,त्याने आतापर्यंत सुमारे २५८ जणांची फसवणूक केली आहे,त्यापैकी बॉलिवूडमध्ये 'ए' श्रेणीमध्ये येणारे सुमारे १०० जण आहेत. याशिवाय'टीव्ही इंडस्ट्री'शी निगडीत असलेले अनेक अभिनेते आणि अभिनेत्री देखील या'सेक्स्टॉरेशन रॅकेट'चे बळी ठरले आहेत.या व्हिडीओच्या बदल्यात हे रॅकेट या सेलिब्रिटीज आणि पीडितांकडून लाखो रुपये घेत असत.या व्हिडिओंचे क्लिप्स नंतर ट्विटर,डार्कनेट आणि टेलिग्राम यासारख्या सोशल मीडिया ऍप्लिकेशनवर इतर लोकांना मोठ्या पैशांना विकले गेले जाते.

काय आहे मोडस ऑपरेंडी

'सेक्स्टॉरेशन' मध्ये एखाद्या व्यक्तीशी सोशल मीडियाद्वारे(स्नॅपचॅट आणि इंस्टाग्राम)ऍप वरून पहिल्यांदा मैत्री केली जाते.मग ६ महिने किंवा त्याहून अधिक काळानंतर ती व्यक्ती त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवली जाते.मग एखाद्या दिवशी व्हिडिओ कॉलवर त्या व्यक्तीला नग्न होण्यास सांगितले जाते. त्याचा नग्न व्हिडीओ रेकॉर्ड केला जातो.यानंतर 'ब्लॅकमेलिंग' सुरू होते.सार्वजनिक व्यासपीठावर हे नग्न व्हिडिओ अपलोड न करण्याच्या अटीवर सेलिब्रिटी किंवा त्या व्यक्तीकडून मोठी रक्कम उकळली जाते.

नेपाळच्या बँक खात्यातून व्यवहार

'सायबर सेल'ला त्याच्या तपासात कळले की या आरोपींनी तपास यंत्रणांना टाळण्यासाठी नेपाळच्या बँक खात्यातील पैशांच्या व्यवहारांसाठी वापर केला आहे.या लोकांना भीती वाटली की जर हे प्रकरण समोर आले तर त्यांचे खाते बंद पाडले जाईल.'सायबर सेल'ने आता नेपाळ प्रशासनाला या प्रकरणाची माहिती दिली आहेआणि बँक खात्याशी संबंधित तपशील मागितला आहे जेणेकरून प्रकरणाचा तळ गाठता येईल.